आमदार सुहास कांदे यांच्या विजयाला सौ. अंजुमताई कांदे यांचा ही हातभार.!
सा. श नैश्वर टाइम्स वृत्तसेवा
नांदगाव (nashik) संतोष कांदे
असे म्हटले जाते की, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे त्या घरातील स्त्रीचा हात असतो. काही अपवाद सोडता ही उक्ती खरी ठरत असल्याचे दिसून येते. अगदी यांचप्रमाणे नांदगाव विधानसभा मतदार संघातून सुमारे ९० हजार मतांच्या मताधिक्याने निवडून आलेल्या आमदार सुहास कांदे यांच्या विजयात ज्या प्रमाणे सर्व नेते, कार्यकर्ते, आणि जनता यांचा सहभाग असला तरी सौ. अंजुमताईंनी या विजयासाठी केलेले प्रयत्न दुर्लक्षुन चालणार नाहीत. हे तितकेच खरे.!
. २०१९ मध्ये सुहास कांदे आमदार झाले तेव्हापासून ते आजतगायत सौ. कांदे यांनी महिला संघटन उभे करत महिलांची एक भक्कम फळी उभी केली आहे. महिलांना नुसते पक्षाची पदे देऊन त्यांचा वापर करणारे भरपूर आहेत. मात्र आपल्या माध्यमातून त्यांच्या घर संसाराला हातभार लागावा यासाठी करोडो रुपये खर्च करून गृहउद्योगाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या त्या राजकीय घरातील पहिल्या महिला ठरल्या आहेत.
. यापूर्वी मतदार संघातील पती नोकरीस असेल तर त्या घरातील महिला सहसा राजकारणात दिसत नाहीत.मात्र सौ. अंजुमताई यांनी या महिलांना ही घराबाहेर पडण्यास परावृत्त केलेच,त्यांना व्यासपीठावर बसवून हातात माईक घेऊन भाषण करणे ही शिकवले आहे. आणि या महिलांना राजकारणापुरते सीमित न ठेवता त्यांना गृहउद्योगात सामावून घेत त्यांचा स्वाभिमान जागृत केला आहे. म्हणजेच या महिला ही आता गृउद्योगात भाग घेऊन घरसंसाराला पतीच्या खांद्याला खांदा लावून हातभार लावू शकणार आहेत.त्याचबरोबर आदिवासी, वंचित घटकातील महिलांना ही त्यांनी परके मानले नाही.त्यांचा ही स्वाभिमान जागृत करून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले आहे.
. या महिलांना असे पाठबळ मिळाल्याने साहजिकच या महिलांची सर्वच्या सर्व मते आमदार सुहास कांदे यांच्या पदरात पडली आहेत. त्याचबरोबर सौ. कांदे यांनी शासनाच्या लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून ते मंजूर होईपर्यंत सर्व प्रकारचे सहाय्य केल्याने तो ही फायदा आमदार कांदे यांना झाला. तसेच बचत गटाच्या महिलांना ही सर्व प्रकारचे सहकार्य वर त्यांचे मेळावे घेत त्यांचे ही मोठे संघटन उभे केले.अनेक गावांमध्ये बचतगट भवन उभारून दिले. तो ही फायदा सौ. अंजुमताई यांच्यामुळे आमदारांना झाला आहे. एक ना अनेक कारणांनी आमदार सुहास कांदे यांच्या विजयात सौ. अंजुमताई यांचा खारीचा वाटा आहे.
.
Comments
Post a Comment