सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ

नांदगाव-: संतोष कांदे
    राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील कार्यकर्त्यांशी हितगुज करत ; मार्गदर्शन केले.
       माजी खा.भुजबळ यांनी आज तालुक्यातील पक्षाच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आमदार पंकज भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयात बोलावली होती.यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीच्या निमित्ताने तालुका कार्यकारिणी,गट,गण,प्रमुख यांच्या नियुक्ती संदर्भात महत्वपूर्ण चर्चा केली.यावेळी राष्ट्रावादी कॉंग्रेस चे जिल्हा अध्यक्ष रविंद्र पगार,तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता, दिलीप इनामदार, देवदत्त सोनवणे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.शहर उपाध्यक्ष सतीष आहिरे यांनी माजी खा. समीर भुजबळ यांचा सत्कार केला.
        या बैठकीला संतोष गुप्ता, साहेबराव पाटील, दिलीप इनामदार, राजेंद्र गायकवाड, राजेंद्र नहार, बाळाकाका कलंत्री, विश्वास अहिरे, वाल्मिक टिळेकर, देवदत्त सोनवणे, अमित पाटील, दत्तू पवार, दिपक खैरनार, अशोक पाटील, मुकुंद खैरणार, राजेंद्र आहेर, भाऊसाहेब सूर्यवंशी, कांतीलाल छाजेड, बाळासाहेब महाजन, राहुल भोपळे, राजेंद्र मोकळ, महेंद्र गायकवाड, प्रल्हाद मंडलिक, संदिप पगार, अझिम काझी, सोपान पवार, राजेंद्र सावंत, खंडू दंडगव्हाळ, भावडू गिते, युवराज केसकर, योगेश बोरसे, अतुल बोरसे, धनराज बुरकुल, समाधान जाधव, राजेंद्र लाठे, अरुण निकम, सागर आहेर, संभाजी शिंदे, सचिन कोरडे, आदींसह मोठ्या संख्येने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.  
 

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!