स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

नांदगाव-: संतोष कांदे
येत्या जिल्हा परिषद,पंचायत समिती अन नगरपालिका निवडणूका महाविकास आघाडी करून लढवल्या जातील,मात्र स्थानिक पातळीवर आमदार सुहास कांदे यांचा शब्द प्रमाण असेल अशी संदिग्ध भूमिका घेत शिवसेनेचे जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांनी भविष्यात तालुक्यातील राजकीय वाटचाल कशी असेल याचे थोडक्यात विवेचन केले आहे.
     सन २०२२ मध्ये होऊ घातलेल्या जिल्हा परिषद,पंचायत समिती,मनमाड व नांदगाव नगरपालिका,कृषी उत्पन्न बाजार समिती,आणि झालीच तर जिल्हा बँक अशा भरगच्च निवडणुका आहेत.आणि या निवडणुका दरम्यान एका दैनिकाने घेतलेल्या जनमत चाचणीत सेना,राष्ट्रवादी अन काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र लढले तरच सत्ता मिळवणे शक्य असल्याचा निष्कर्ष काढला आहे.आणि याची दखल खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार,व मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांनी घेतली असल्याने जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांनी स्थानिक स्वराज्य निवडणुकीसंदर्भात जे भाष्य केले आहे,त्याला विशेष महत्व आहे.
     सद्यस्थितीत तालुक्यात जिल्हा परिषदचे चार गट व आठ गण आहेत.त्यात सेना-२,काँग्रेस-१,आणि भाजप-१ असे बलाबल आहे.तर पंचायत समितीवर सेनेची बहुमतात सत्ता आहे.मात्र यंदा एक गट व दोन गण वाढणार असल्याने इच्छुकांच्या गोटात खळबळ उडाली आहे.कारण वाढलेला गट कुणाची बाजी सोपी करणार अन कुणाची डोकेदुखी वाढवणार याची चिंता सर्वांना लागून राहिली आहे.
     शिवसेनेचे सर्वेसर्वा तथा तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांनी जनमतावर भावनिक दृष्टया चांगलाच ताबा मिळवला असला तरी कार्यकर्त्यांना वरील स्वराज्य संस्थेवर लोकप्रतिनिधींत्व देताना त्यांचा चांगलाच कस लागणार आहे,असे चित्र भविष्यातले असेल.! कारण न्यायडोंगरी,जातेगाव,साकोरा,या गट व गणातील राजकीय आरक्षण आणि तेथील सेनेच्या राजकीय पदाधिकार्यांची सोय लावत असताना महाविकास आघाडीच्या उमेदवारांचाही विचार आमदार श्री.कांदे याना करावा लागणार आहे.
      
     

Comments

Popular posts from this blog

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ