चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप आवश्यक-आ.सुहास कांदे

नांदगाव-: समाजात वावरत असताना चांगले काम करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीवर वेळोवेळी पडणारी कौतुकाची थाप त्या व्यक्तीचा हुरूप वाढवतेच ; मात्र इतरांना ही चांगले काम करण्यास प्रेरणा देते,असे प्रतिपादन तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांनी केले.
     स्व.गंगाधर (अण्णासाहेब) शिवराम आहेर शिक्षक पतसंस्थेच्या वतीने आयोजित नांदगाव रत्न व विद्यार्थी गुण गौरव सोहळ्यात ते बोलत होते.यावेळी नांदगाव रत्न पुरस्काराने युवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुमित सोनवणे व त्यांचे सहकारी तसेच शिक्षक गोरख जाधव यांचा आमदार श्री.कांदे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
    पुढे बोलताना आमदार कांदे यांनी शिक्षकांच्या ज्या समस्या या पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी मांडल्या होत्या,त्यावर भाष्य करताना 'शिक्षकांनी ही कर्त्यव्याचे भान ठेवावे,मुख्यालयी राहणे ही गोष्ट अनेक अडचणीमुळे शक्य नसल्याची जाणीव मला आहे,मात्र वेळेत शाळेत पोहचून कामकाज करणे यात हयगय होता कामा नये,तसेच जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात मुख्यमंत्री व अन्य मंत्री महोदय यांच्याशी चर्चा घडवून आणण्याची जबाबदारी मी पूर्ण करेन,असा शब्द देतो.असे ते म्हणाले.
     यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदच्या महिला व बालकल्याण समिती सभापती अश्विनी आहेर,पंचायत समिती सभापती सुभाष कुटे,जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरसे,आमदार कांदे यांच्या सुविद्य पत्नी सौ.अंजली कांदे,गटशिक्षणाधिकारी प्रमोद चिंचोले, श्रीमती नंदा ठोके,सौ.सुमन निकम,आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ