सा.शनैश्वर टाइम्स..निःस्वार्थ सेवा सामाजिक संस्थेचे कार्य प्रेरणादायी-: जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.सांगळे.!

     नांदगाव-: संतोष कांदे

निःस्वार्थ सेवा सामाजिक संस्था करत असलेले कार्य खरोखरच वाखाणण्याजोगे आहे,जे कार्य करण्यास शासनाला मर्यादा येतात,ते कार्य अशा सामाजिक संस्थांनी केल्यास समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळेल.असे प्रतिपादन जिल्हा परिषदच्या अध्यक्षा शीतल सांगळे यांनी केले.
      तालुक्यातील पानेवाडी येथे निःस्वार्थ सेवा या सामाजिक संस्थेमार्फत सायकल,ढोल,लेझीम,संगीत पेटी आदी साहित्य वाटप तसेच कर्ही येथे याच संस्थेने बांधून दिलेल्या एका जलकुंभाचे लोकार्पण ही अध्यक्ष सांगळे यांचे हस्ते करण्यात आले.त्यावेळी त्या बोलत होत्या.
        यावेळी निःस्वार्थ सेवा सामाजिक संस्थेचे सुरेश डोंगरे,नगरसेवक गणेश धात्रक,गटविकास अधिकारी जे.टी. सूर्यवंशी,सरपंच सौ.मंगल राजेंद्र सांगळे,माजी सरपंच अंकुश कातकडे, संचालक राजेंद्र सांगळे,यावेळी गटविकास अधिकारी सूर्यवंशी यांनी ही उपस्थितांसमोर बोलताना सामाजिक संस्थांकडून लोकहिताच्या योजनांत सहभाग आवश्यक असल्याचे मनोगत व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ