सा.शनैश्वर टाइम्स....गोवर,रुबेला उच्चाटन मोहिमेसाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक-आहेर

                  नांदगाव-: संतोष कांदे

     गोवर व रुबेलाचे देशातून समूळ उच्चाटन करण्यासाठी देशव्यापी मोहीम राबवली जात आहे.त्या अनुषंगाने तालुक्यातील पिंपरखेड येथे या मोहिमेचे उदघाटन न्यायडोंगरी गटाच्या जिल्हा परिषद सदस्या अश्विनी आहेर यांनी केले.
       याप्रसंगी कै. पु.पा.मवाळ विद्यालयात संपन्न झालेल्या या लसीकरण मोहीम कार्यक्रमासाठी प्रताप गरुड,नांदगाव पंचायत समितीच्या उपसभापती आशा आहेर,सरपंच उत्तम सोनवणे,पोलीस पाटील झुरा मेंगाळ, ग्रामपंचायत सदस्य संदीप मवाळ,विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.आर.मवाळ उपस्थित होते.
      यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत बालकांना लसीकरण करून,प्रमाणपत्र देण्यात आले.तर यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्या कु.आहेर यांनी या लसीकरणाचे फायदे व गरज अधोरेखित करून मोठ्या प्रमाणात लाभ घेण्याचे आवाहन केले.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.ससाणे यांनी प्रास्ताविक केले.या मोहिमेसाठी आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी, विद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,आशा सेविका,अंगणवाडी सेविका व असंख्य पालक, विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ