सा.शनैश्वर टाइम्स....शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांचा गौरव.!

अयोध्या यात्रा यशस्वी पार पाडल्याबद्दल केला गौरव..
                
             नांदगाव-: संतोष कांदे
शिवसेनेच्या अयोध्या यात्रेच्या यशस्वी नियोजनामुळे 'राममंदीर' होणारच असा विश्वास निर्माण झाला आहे.या दौऱ्याची सर्वच पातळीवर दखल घेतली असून,यात नाशिक जिल्ह्यातील शिवसैनिकांचा खारीचा वाटा आहे.असे गौरवोदगार सेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख संजय राऊत यांनी काढले.
      मुंबईस्थित महापौर निवासस्थानी शिवसेना पदाधिकारी सत्कार सोहळ्याप्रसंगी राऊत बोलत होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हस्ते या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी जेष्ठ शिवसेना नेते मनोहर जोशी,लीलाधर डाके,खासदार चंद्रकांत खैरे,महापौर विश्वनाथ महाडेश्वर,आदी उपस्थित होते.ते प्रास्ताविक करताना पुढे म्हणाले की,अयोध्या यात्रेची सर्वदूर चर्चा झाली,तसेच श्रीरामजन्मभूमीत शरयू नदीच्या काठावर झालेल्या आरतीची जागतिक पातळीवर दखल घेतली गेली आहे.या यात्रेसाठी नाशिक जिल्ह्यातील शिवसैनिकांची रेल्वेद्वारे सुरक्षित ने-आण केलेल्या जिल्हाप्रमुख सुहास कांदे व इतर पदाधिकाऱ्यांचा खारीचा वाटा होता.त्यासाठी ते गौरवास निश्चित पात्र आहेत.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ