सा.शनैश्वर टाइम्स...ढेकू येथे व्यायामशाळेच्या उभारणीस आर्थिक मदत देऊ.!-महाराष्ट्र केसरी चौधरी.!
नांदगाव-: संतोष कांदे
नांदगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील कुस्तीगीरांना शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्याकामी सहकार्य करू,असे आश्वासन महाराष्ट्र केसरी तथा पोलीस उपअधीक्षक विजय चौधरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका युवा कार्याध्यक्ष भाऊसाहेब सूर्यवंशी यांना दिले.
सूर्यवंशी यांनी पुणे येथे तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी पटकावलेले विजय चौधरी (DySP) , रुस्तुम ए हिंद अमोल बुचडे ,मुंबई महापूर केसरी अक्षय शिंदे यांची भेट घेतली.व तालुक्यातील ज्या मुलांना कुस्तीमध्ये रस आहे,त्यांच्यासाठी शासकीय मदत मिळू शकेल का,तसेच पुणे शहरातील व्यायामशाळेत सराव करण्याची परवानगी मिळू शकेल का.? याबाबत सविस्तर चर्चा करून सहकार्य करण्याची विनंती केली.
यावेळी चौधरी यांनी मदत करण्याचे आश्वासन दिलेच,पण ढेकू येथे व्यायामशाळा उभारा,त्यासाठी आर्थिक मदत देण्याचे यावेळी कबूल केले.या शाळेच्या उदघाटनासाठी मी येईन.असे सांगितले.याप्रसंगी डॉ. प्रदीप चौधरी, प्रसन्न चौधरी, ऋषिकेश जाधव उपस्थित होते.
Comments
Post a Comment