सा.शनैश्वर टाइम्स...पाणी टंचाईचा बाऊ केला जातोय का.?

                 नांदगाव -संतोष कांदे
१९६८ मध्ये खोदलेली विहीर आणि १९७२ मध्ये झालेला पाझर तलाव....मात्र आज ही विहीर संपादित क्षेत्रात समाविष्ट झाल्याने ह्या विहिरीतले पाणी उपसले तर गुन्हा दाखल करण्याची धमकी प्रशासन देत असल्याने यावर मार्ग काय.? असा प्रश्न वॉटर अकाउंट चा गाढा अभ्यास असलेल्या माजी आमदार अँड.आहेर यांना पडला.
    याबाबत अधिक असे की,तालुक्यातील हिंगणेदेहरे येथे १९७२ च्या दुष्काळी परिस्थितीत एक पाझर तलाव निर्माण करण्यात आला.ह्या पाझर तलावासाठी तत्कालीन शेतकऱ्यांनी स्वतःचे हित बघून विनामूल्य जमिनी दिल्याचे सांगितले जाते.मात्र पाझर तलाव होण्यापूर्वी येथे काही शेतकऱ्यांच्या खाजगी विहिरी असल्याचे कागदोपत्री दिसते.सद्यस्थितीत तालुक्यात गंभीर दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे,आणि सर्वाधिक महत्वाचा पाणीप्रश्न मानून प्रशासन पाणी वाचवण्याची पराकाष्ठा करतेय,मात्र असे करत असताना या सरकारी नियमांचा काही ठिकाणी अतिरेक होत असल्याचे चित्र ही दिसून येते.
       १५ नोव्हेंबर रोजी गटविकास अधिकारी जे.टी. सूर्यवंशी यांच्या तोंडी सूचनेनुसार लघु पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता ए. एस. साळी  यांनी हिंगणेदेहरे गावी जावून सदर गावाला पाणी पुरवठा होत असलेल्या पाझर तलाव व त्या लगत विहिरीतून पाणी उपसा करत असलेल्या १२ शेतकऱ्यांची यादी सादर केली.सर्वच शेतकरी बेकायदा पाणी उपसा करत असल्याचे या अहवालात म्हटले,त्यानंतर सदर गावचे ग्रामसेवक यांनी विजपंप काढून घ्या,अन्यथा उद्या पोलीस आणून गुन्हा दाखल करेन.! असा सज्जड दम या शेतकऱ्यांना भरला.त्यावर या शेतकऱ्यांनी माजी आमदार अँड.अनिल आहेर यांना ही बाब अवगत करत बेकायदा पाणी उपसा करत असल्याची बाब नाकारली.व तसे कागदपत्रे ही दाखवली.तलाव निर्माण होण्यापूर्वीपासून असलेली विहीर बेकायदा कशी.? या असा प्रश्न घेऊन माजी आमदार अँड.अनिल आहेर यांनी नायब तहसीलदार योगेश जमदाडे व टंचाई शाखेचे सागर खरोटे यांच्याशी चर्चा केली असता,समन्वयाने मार्ग काढण्याचे आश्वासन जमदाडे यांनी दिले.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ