सा.क्रांतिवीर..विकर्णश्री कडून मोफत गॅस वाटप
नांदगाव-: संतोष कांदे
तालुक्यातील न्यायडोंगरी येथे आज (दि.६) रोजी पंतप्रधान उज्वला गॅस योजनेअंतर्गत २४ लाभार्थी कुटुंबाना विकर्णश्री इंडेन गॅस तर्फे मोफत गॅस वाटप करण्यात आले.
गावातील श्रीराम मंदीर पटांगण, शिवाजी चौक येथे पंतप्रधान उज्वला गॅस योजनेअंतर्गत दारिद्रय रेषेखालील व अंत्योदय वर्गातील लाभार्थ्यांना हे वितरण करण्यात आले.यावेळी सर्व पक्षीय नेते - कार्यकर्ते , जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था3 , आम्ही न्यायडोंगरीकर ग्रुप, विलासभाऊ विजय आहेर मित्र मंडळ व न्यायडोंगरी गावातील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment