सा.क्रांतिवीर...हातगांव धरणालगत खड्डे खोदून पाणी चोरणाऱ्यावर ग्रामपंचायतीच्या सजगतेमुळे कारवाई.!
पोलीस, महसूल,जलसंपदा,पंचायत समिती यांची संयुक्त कारवाई
नांदगांव-: संतोष कांदे
तालुक्यातील न्यायडोंगरी गावाला पाणीपुरवठा होत असलेल्या हातगाव (ता.चाळीसगांव) धरणालगतच्या उद्भव विहिरी जवळ खड्डे खोदून पाणी चोरणाऱ्यावर काल (दि.१६) रोजी तहसिलदारांच्या संयुक्त पथकाने कारवाई केली.
तालुक्यात पिण्याचे पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष निर्माण झाले आहे.आहे त्या पाण्याचे जतन त्या-त्या स्वराज संस्था व तालुका प्रशासन करत आहेत.मात्र पिण्याच्या पाण्यापेक्षा शेतीसाठी हे पाणी वापरण्याकड़े अनेकांचा कल दिसून येत आहे.न्यायडोंगरी गावाला ज्या हातगाव धरणालगत असलेल्या उद्भव विहिरीतुन पाणी पुरवठा केला जातो.तेथे मोठ-मोठे खड्डे खोदून ते पाणी शेतीसाठी उपसा केला जात होता.म्हणून या ग्रामपंचायतीचे मार्गदर्शक तथा माजी सभापती विलास आहेर,सरपंच संजय आहेर यांनी महसूल,पोलीस, ग्रामीण पाणी पुरवठा,पंचायत समिती,जलसंपदा आदी विभागांना पत्र देत 'ही पाणी चोरी सुरुच राहीली तर गावाला भीषण पाणी टंचाई चा सामना करावा लागेल,याबाबत अवगत केल्यानंतर तहसीलदार श्रीमती भारती सागरे,गटविकास अधिकारी जे.टी. सूर्यवंशी,आदिंसह अन्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी या धरणावर धड़क दिली.व पाणी चोरणाऱ्या शेतकऱ्यांचे विजपंप जप्त केले.मात्र पुन्हा चोरी करणार नाही, असे या शेतकऱ्यांनी सांगितल्याने त्यांना विजपंप परत करण्यात आले.
Comments
Post a Comment