सा.क्रांतिवीर...तहसीलदार श्रीमती सागरे यांची धड़ाकेबाज कारवाई.!
नांदगांव-: संतोष कांदे
नांदगांव तालुका दृष्काळी घोषित होऊन उपाययोजना करण्याचे काम शासकीय पातळीवर सुरु झाले आहे,मात्र उपलब्ध पाणीसाठयाचे रक्षण ही तितकेच महत्वाचे मानून तहसीलदार श्रीमती भारती सागरे यांनी पाणी चोरांवर कड़क लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे.
तालुक्यातील माणिकपुंज,गळमोडी, चांदेश्वरी आदी छोट्या-मोठ्या जलस्त्रोतामध्ये सदयस्थितीत बऱ्यापैकी पाणी उपलब्ध आहे.मात्र हे पाणी काही शेतकरी शासन आदेश धूड़कावून म्हणा किंवा पिण्याच्या पाण्याचे महत्व लक्षात न घेता रब्बी हंगामातील पिकांना देत असल्याची माहीती मिळाल्याने तहसीलदार श्रीमती सागरे यांनी सदर ठिकाणी भेटी देत या पाणी चोरी करणाऱ्या शेतकऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.
तसेच काही विजपंप ही यावेळी जप्त करण्यात आले असता, पुन्हा असे करणार नाही. असे या शेतकऱ्यांनी आर्जव केल्याने पंप परत करण्यात आले.यावेळी तहसीलदार श्रीमती सागरे यांच्या सोबत महसूल कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते.
Comments
Post a Comment