सा.क्रांतिवीर...मुक्या जिवाला ही येथे मिळतोय आधार.!

नस्तनपूरच्या शनी संस्थानचा भूतदयेचा एक अभिनव उपक्रम.!

नांदगाव-: संतोष कांदे
मानवातील भाविकांसाठी सुविधा उभारून त्याचा लाभ करून देणे,हे त्या-त्या धार्मिक तिर्थक्षेत्राचे कर्तव्य असते.किंबहुना त्या क्षेत्राचे जनमानसातीले महात्म्य वाढावे म्हणून ही कृती आवश्यक असते.मात्र नांदगाव तालुक्यातील नस्तनपूर येथील श्री.शनी संस्थान ने येथे येणाऱ्या पक्षांनाही शनीदेवाचे भक्त समजून त्यांच्यासाठी अन्न व पाण्याची सोय करून ऐन दुष्काळी परिस्थितीत एक आदर्श उभा केला आहे.
      या बाबत अधिक असे या संस्थान चे जनरल सेक्रेटरी तथा माजी आमदार अड.अनिल आहेर यांनी यशस्वी राजकीय जीवन अनुभवल्यानंतर सर्वाधिक लक्ष या श्री.शनी संस्थानच्या विकासाकडे दिले असल्याचे पदोपदी जाणवते.अगदी छोट्या-मोठ्या सुविधा उपलब्ध करून देत असताना,सामाजिक उपक्रम ही संस्थान च्या मदतीने सुरूच असतात.मग टँकर ने पाणी पुरवणे असो ; वा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप.! यासह अनेक नवनवीन समाजपयोगी कल्पना राबवून श्री.शनी संस्थान प्रकाशझोतात आले आहे.
     वृक्ष लागवड एक सोपस्कार ठरू नये,यासाठी थेट पाच वर्षे वयाची झाडे लावण्याचा प्रयोग म्हणजे खरे-खुरे काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न होता,असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.या परिसरात लोभस असे विकासकामे करणारे माजी मंत्री आमदार छगन भुजबळ यांचे योगदान न विसरता येण्यासारखे आहे,मात्र त्या कामांची देखभाल ठेवून जपणूक करणे ही तितकेच महत्वाचे आहे,हे समजून कर्तव्य पार पाडले जात आहे.
     दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर या हिरव्या वनराईत पक्षांची वाढलेली गर्दी,त्यांचा चिवचिवाट ग्रामीण भारताचे खरे चित्र उभे करतो.आणि या ठिकाणी या पक्षांसाठी झाडांवर अन्न व पाण्याची सोय करण्यात आली आहे.जेव्हा या प्राण्यांना भूक किंवा तहान लागेल तेव्हा त्यांना अन्न व पाणी मिळेल,अशी व्यवस्था करण्यात आली आहे.व संस्थानचे सेक्रेटरी अड.अनिल आहेर रोज नित्यनेम याची पाहणी करतात.यामुळे किमान पक्षांचा तरी दुष्काळ या ठिकाणी सुसह्य झाल्याचे चित्र दिसते.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ