सा.क्रांतिवीर...४९ हजार २०० बालकांचा गोवर,रुबेलामुळे दरवर्षी मृत्यू ; त्यामुळे हे लसीकरण अत्यावश्यक.!- डॉ.बोरसे

येत्या २७ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर पर्यंत मोहीम चालणार

            नांदगाव-: संतोष कांदे
देशभरात शासकीय अहवालानुसार गोवर,रुबेलामुळे पन्नास हजाराच्या आसपास बालकांचा मृत्यू होतो,मात्र हा झाला सरकारी आकडा मात्र दुर्गम भागातील मृत्यू हे प्रकाशझोतात येत नाहीत,अन्यथा हा आकडा लाखांच्या पटीत असू शकतो,म्हणून गोवर,रुबेलाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सर्वच नागरिकांनी हे एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून पूर्ण सहभाग देत ही मोहीम यशस्वी करावी.असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.रोहन बोरसे यांनी रुग्णालय आवारात संपन्न झालेल्या संकल्प सभेत केले.
   यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष राजेश कवडे,पोलीस निरीक्षक अनिल भवारी, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मारुती जगधने,बालरोग तज्ञ डॉ.शिरोळे उपस्थित होते.
    डॉ.बोरसे पुढे म्हणाले की,आतापर्यंत २० राज्यांमध्ये ही मोहीम यशस्वी झाली आहे.सुमारे ११ कोटी मुलांना लसीकरण देण्यात आले असून,अजून ३ कोटी ५० लाख बालकांना हे लसीकरण केले जाणार आहे.१९७८ मध्ये देवी रोगाचे उच्चाटन केल्यानंतर भारताने पोलिओला ही हद्दपार केले आहे.व आता आपल्या सर्वांच्या सहकार्याने गोवर व रुबेला ही देशातून घालवायचे आहे.त्यामुळे हे एक परम कर्तव्य समजून सहकार्य द्या.! असे भावनिक आवाहन ही डॉ.बोरसे यांनी यावेळी केले.तसेच उपस्थित नागरिकांच्या शंकाचे निरसन ही केले.
    तालुक्यातील ७५०० शाळा शिकणारे व ३५०० शाळाबाह्य अशा अकरा हजार बालकांना हे लसीकरण केले जाणार आहे.यात नऊ महिने ते १५ वर्ष वयाच्या बालकांचा समावेश असणार आहे,व हे लसीकरण उजव्या दंडावर केले जाणार आहे.आणि विशेष म्हणजे या लसीकरण चा कुठलाही दुष्परिणाम होणार नसल्याचे डॉ.बोरसे यांनी शेवटी स्पष्ट केले.
    या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता,काँग्रेसचे समाधान पाटील,शिवसेनेचे सुनील जाधव,अँड.सचिन साळवे,शिवसंस्कारचे सुमित गुप्ता,युवा फाउंडेशनचे सुमित सोनवणे,जॉईंट ग्रुपचे जगन्नाथ साळुंके,संजय मोकळ,भगवान सोनवणे,किरण काळे,पंकज देवकाते,चेतन पाटील,डॉ.रवींद्र वाघ,रुग्णकल्याण समितीचे मुकुंद खैरनार,जमीर इमान सौदागर,आदींसह शेकडो नागरीक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ