सा.क्रांतिवीर...क्रांतिवीर वसंतराव नाईक व लोकनेते कै. मुंडे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम
नांदगाव-: संतोष कांदे
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मोलाची कामगिरी बजावलेल्या नांदगाव तालुक्यातील वेहेळगावचे भूमिपुत्र क्रांतिवीर वसंतराव नाईक यांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त विविध समाजपयोगी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे.तसेच यावेळी दिवंगत लोकनेते केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांची ही जयंती साजरी केली जाणार आहे.
या कार्यक्रमासाठी गावातील सर्व आबालवृद्ध एकत्र आले आहेत.दोन दिवसीय या कार्यक्रमात नाशिक येथील राजेंद्र महाराज काळे यांचे 'पारंपरिक भारूड,योगाचार्य राजेंद्र काळे यांचे दोन दिवस मोफत योगा शिबिर, तसेच आनंद दराडे (मनमाड),अशोक सानप (वेहळगाव) यांचा आनंद उत्सव(Happyness programme),आणि प्राध्यापक जितेंद्र मतकर (म.फुले कृषी विद्यापीठ राहुरी) यांचे हिंदवी स्वराज्य संस्थापक राजा शिवछत्रपती(पुस्तका पलिकडले शिव छत्रपती) यावर व्याख्यान होणार होणार आहे.
गावातील श्रीराम मंदिरात संपन्न होणाऱ्या कार्यक्रमातील योग व आनंद उत्सव कार्यक्रमासाठी लवकरात-लवकर नावे नोंदविण्याचे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.
Comments
Post a Comment