सा.क्रांतिवीर...सौ.कमलाबाई कासलीवाल विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे क्रीडा स्पर्धेत यश.!
नांदगाव-: संतोष कांदे
सौ.कमलाबाई माणिकचंद कासलीवाल माध्यमिक विद्यालय नांदगाव शाळेचे रोप मलखांब व पोल मलखांब स्पर्धेत सहा खेळाडूंची राज्य स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.
आज राजापूर (ता.येवला) येथे झालेल्या जिल्हा स्तरीय मलखांब स्पर्धेत सौ कमलाबाई माणिकचंद कासलीवाल माध्यमिक विद्यालय नांदगावच्या खेळाडूंनी आपल्या अप्रतिम खेळाचे प्रदर्शन करत हे यश मिळवले.शाळेचे तब्बल सहा खेळाडूंची राज्य स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याने आनंद व्यक्त होत असून,या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये वैष्णवी नेमनर,ऋतिका भालेकर,कल्याणी काळे,करुणा कुमावत , हिम्मत सरोदे,उमेश गायकवाड यांचा समावेश आहे.
यशस्वी खेळाडूंचे व क्रीडा मार्गदर्शक शिक्षक श्री.बागूल,व श्री.त्रिभुवन यांचे संस्थेचे चेअरमन सुनिल कुमार कासलीवाल व्हा. चेअरमन,रमणलाल कासलीवाल, सचिव विजय चोपडा,सहसचिव सौ. प्रमिलाताई कासलीवाल. पदाधिकारी,रिखबचंद कासलीवाल,जूगलकिशोर अग्रवाल, सुशिलकुमार कासलीवाल, विजयकुमार कासलीवाल, दिलीप पारख ,श्रीमती कमलाकाकी कासलीवाल.डाॅ अनिलकुमार कासलीवाल, महेंद्रकुमार चांदीवाल, प्रशासक श्री. गुप्ता ,मुख्याध्यापक, राजेंद्र खरोटे प्राचार्या सौ. पिल्ले,श्री. सावंत यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment