सा.क्रांतिवीर...विकर्णश्री गॅस एजन्सी कडून बोलठाण येथील २६ महिलांना गॅस वाटप.!

               नांदगाव-: संतोष कांदे

   पंतप्रधान उजवला गॅस योजनेअंतर्गत न्यायडोंगरी येथील विकर्णश्री गॅस एजन्सी मार्फत तालुक्याच्या घाटमाथ्यावरील बोलठाण येथे २६ महिलांना मोफत गॅसचे वाटप नांदगाव पंचायत समितीच्या उपसभापती सौ.आशा किशोर आहेर यांचे हस्ते करण्यात आले.
      यावेळी माजी सभापती विलास आहेर,संजय सानप,सरपंच ज्ञानेश्वर नवले,मश्चिद्र पठाडे,सचिन गंडे,सुभाष गंडे,रमेश खुटे, सागर पवार,गणेश पवार,विनोद साबळे,तेज काळे,योगेश गुंजाळ,विजय व्यवहारे,ज्ञानेश्वर रिंढे, उद्धव वाघ,भाजप शहर अध्यक्ष नाना नवले,आदींसह शेकडो ग्रामस्थ,लाभार्थी उपस्थित होते.
      दरम्यान यावेळी प्रधानमंत्री जनकल्याण योजनेचा प्रचार प्रसार अभियान योजनेचा शुभारंभ ही करण्यात आला.याप्रसंगी उत्तर महाराष्ट्र अंतर्गत योजना समितीचे  प्रचार प्रसार अभियान उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष संजय सानप यांनी प्रधानमंत्री आवास योजना, मुद्रा लोन,विधवा, परित्यक्ता महिला, जेष्ट नागरिक यांना शासकीय योजने अंतर्गत मिळणारी पेंशन यासह सर्व योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी कृती आराखडा तयार करून नागरिकांना लाभ मिळवून देणार असल्याचे  सांगितले आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ