सा. क्रांतिवीर..पाणी टंचाईचा खरा अर्थ जाणून घ्यायचा असेल तर २४ तास पाणी न पिता राहून दाखवा-: डॉ.गिते

विंधन विहिरीसाठी प्रपत्र भरून न देणाऱ्या ग्रामसेवकांना खडसावले..वेतनातून टँकर चा खर्च वसूल करेन...

                 नांदगाव-: संतोष कांदे

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न किती गंभीर असतो,याची जाणीव होण्यासाठी फक्त २४ तास पाणी न पिता राहून बघा.! असा उपरोधिक सल्ला जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नरेश गिते यांनी तालुक्यातील ग्रामसेवकांना आज दिला.
     तालुक्यातील पाणीप्रश्न,अपूर्ण घरकुले,तसेच पाणी पुरवठा योजनेसाठी कार्यान्वित टँकर आदी विषयांचा आढावा घेण्यासाठी डॉ.गिते यांनी पंचायत समिती कार्यालयात बैठक घेतली.यावेळी जिल्हा परिषदच्या बांधकाम सभापती मनिषा पवार,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार,तहसीलदार भारती सागरे, सभापती विद्या पाटील,जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरसे,कार्यकारी अभियंता पुरूषोत्तम ठाकूर,आदींसह लोकप्रतिनिधी व अधिकारी व विभागप्रमुख उपस्थित होते.
      यावेळी सीईओ डॉ.गिते यांनी ग्रामसेवकांना उद्देशून, पाणी हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे,तालुक्यात पाणी टंचाई सुरू असतानाही विंधन विहिरीसाठी प्रपत्र न भरून देणाऱ्या ग्रामसेवकानां करत विंधन विहिरीस पाणी लागले तर टँकरसाठी होत असलेला खर्च वसूल करण्याचा इशारा दिला.
          राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंच्या आराखड्यात  नांदगाव तालुक्यातील  १६ योजना प्रस्तावित असून यापैकी ५ योजनांचे सर्वेक्षण बाकी काही सदरचे सर्वेक्षण तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी डॉ.गिते यांनी दिले.तालुक्यात सुरू असलेले टँकर नादुरुस्त असल्याची तक्रार जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांनी यावेळी केली. याबाबत तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांना तात्काळ टँकर बदलून देण्याची कार्यवाही  करण्याचे आदेश देण्यात आले.
     गावात टँकर सुरू असतानाही विंधन विहिरीसाठी ग्रामसेवकांनी अद्यापही विहित नमुन्यात माहिती दिलेली नसल्याने डॉ. गिते यांनी याबाबत नाराजी व्यक्त करत सदर गावात विंधन विहिरींना पाणी लागल्यास टँकर साठी होणारा खर्च वसूल करण्याचा इशारा दिला. पाणी टंचाई काय असते हे जाणून घ्यायचे असेल तर २४ तास पाणी न पिता राहून दाखविण्याचे आव्हानही त्यांनी यावेळी ग्रामसेवकाना दिले.
        नळ योजना दुरुस्ती, तात्पुरत्या नळ पाणी योजना, विहीर खोल करणे, विहीर अधिग्रहित करणे याबाबतही आढावा घेण्यात आला. नांदगाव ४२ गाव पाणी पुरवठा योजनेची पाणी पट्टी वसुलीबाबत आढावा घेतला असता वसुली होत नसल्याचे आढळून आले. पाणी पट्टी वसुली झाली नाही व वीज बिलामुळे योजना बंद झाली तर याची जबाबदारी ग्रामसेवक व गटविकास अधिकाऱ्यांची राहील असेही डॉ गिते यांनी यावेळी सांगितले.जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती मनीषा पवार यांनी पाणी टंचाईबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असून पाणी टंचाईबाबत जबाबदारीने काम करण्याचे आवाहन केले. पाणी टंचाईचे प्रस्ताव जिल्हा परिषदेमार्फत तात्काळ मार्गी लावण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
         या बैठकीस पंचायत समिती सभापती विद्या पाटील, जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरसे,  पंचायत समिती सदस्य सुभाष कुठे, मधुबाला खिराडकर, तहसीलदार भारती सागरे, कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम ठाकूर, गट विकास अधिकारी जे.टी. सूर्यवंशी,ग्रामसेवक आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ