सा.शनैश्वर टाइम्स....पिंप्राळे येथील वीज पडून मृत्यू झालेल्या कुटुंबाला एक महिन्याच्या आत शासकीय मदत प्राप्त.!
तहसीलदार श्रीमती भारती सागरे यांची कार्यतत्परता.!
नांदगाव-: संतोष कांदे
तालुक्यातील पिंप्राळे येथील माधव भानुदास सदगीर या तरुणाचा वीज पडून एक महिन्यांपूर्वी मृत्यू झाला होता,त्याच्या मृत्यूने कोलमडून पडलेल्या सदगीर कुटुंबाला अत्यंत कमी वेळात चार लक्ष रुपयांची शासकीय मदत मिळवून देत आर्थिक आधार तहसीलदार श्रीमती भारती सागरे यांनी दिला.यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष दत्तराज छाजेड,आमदार पंकज भुजबळ यांचे प्रतिनिधी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता,तलाठी राहुल रिंढे,महसुलचे कर्मचारी प्रमोद साळुंके,सागर खरोटे,परेश रायजादे,सेतू संचालक सचिन निकम,नांदगाव तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष कांदे व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
तहसीलदार श्रीमती सागरे यांनी अत्यंत कमी वेळात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे वडील भानुदास सदगीर यांना सुमारे चार लाख रुपयांचा धनादेश प्रदान केल्यानंतर या तरुणाच्या मृत्यूने हवालदिल झालेल्या सदगीर कुटुंबाने कृतज्ञता व्यक्त केली.
Comments
Post a Comment