सा.क्रांतिवीर...माजी उपमुख्यमंत्री भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी

तहसीलदार श्रीमती सागरे यांना राष्ट्रवादी व समता परिषद चे निवेदन

नांदगाव-: संतोष कांदे
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्या विरोधात आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष नांदगांव तालुका व समता परिषद नांदगांव शहर यांच्या तर्फे तहसिलदार नांदगांव यांना निवेदन देण्यात आले.

      आमदार भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वी मनुस्मृती जाळली होती, त्याचा राग येवून काही सनातनवाद्यांनी भुजबळ यांना दिलेल्या धमकीत तुमचा दाभोळकर, पानसरे करू व जीवे ठार मारू अशा स्वरूपाची धमकी दिली आहे. त्यामुळे आमदार भुजबळ यांच्या जीविताला धोका निर्माण झालेला असून, महाराष्ट्राच्या राजकारणात, समाजकारणात व देशातील ओबीसींसाठी मोलाचे योगदान असून नाशिक जिल्ह्याच्या विकासात मोठा वाटा असल्याने जनतेने त्यांना विकास पुरुष म्हणून संबोधले आहे. जेष्ठ लोकप्रतिनिधींना अशा प्रकारे लेखी धमकी मिळणे ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. कायदा व सुव्यवस्था महाराष्ट्र राज्यात शिल्लक राहिलेली नाही, असे यावरून स्पष्ट होत आहे.आमदार भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्या-या प्रवृत्तींचा शोध घेवून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. असे या निवेदनात म्हटले आहे, तसेच आमदार भुजबळांच्या जीविताला धोका निर्माण झालेला असल्यामुळे त्यांना विशेष सुरक्षा व्यवस्था शासनाने तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी असेही म्हटले आहे.
        यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष संतोष गुप्ता, मनमाड शहर अध्यक्ष राजेंद्र पगारे, पापा थॉमस, नगरसेवक वाल्मिक टिळेकर, बाळकाका कलंत्री, राजेंद्र गायकवाड, शहर उपअध्यक्ष सतीष आहिरे, वाल्मिक जगताप, राजेंद्र जाधव, विश्वास अहिरे, भाऊसाहेब सूर्यवंशी, राजेंद्र लाठे, दत्तू पवार, देविदास भोपळे, नारायण पवार, सचिन देवकते, बाबा पठान, फिरोज पठान, फिरोजभाऊ फुले शाहू आंबेडकर मंच अध्यक्ष, भावडू गिते, सागर आहेर, महेंद्र गायकवाड, संदिप पगारे, प्रविण सोमासे, राज पवार, नाना जगताप, गौतम पवार, अरुण साळवे, अर्जुन पवार, विलास कोतकर, गोविंद जगताप, विशाल पवार आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ