सा.क्रांतिवीर...पाणी उपसा करणाऱ्या एका ट्रक्टरसह आठ विजपंप जप्त.!
तहसिलदारांच्या नेतृत्वाखाली सर्व प्रशासकीय यंत्रणेची कारवाई, दिवसभरात ५५ विजपंप काढले.
नांदगांव-: संतोष कांदे
तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची बिकट अवस्था बघता सर्वच प्रशासकीय यंत्रणा उपलब्ध जलसाठयातील पाणी वाचवण्यासाठी सरसावली असल्याचे चित्र तालुक्यातील माणिकपुंज धरण परिसरात आज दिसून आले.
याबाबत अधिक असे की,काल रोजी न्यायडोंगरी गावाला पाणी पुरवठा होत असलेल्या उद्भवाजवळील पाणीचोरी रोखल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेने आपला मोर्चा जळगाव बुद्रुक, कासारी परिसरातील उपलब्ध जल साठा वाचवण्याकड़े लक्ष पुरवले आहे.आज सकाळी सहा वाजेपासून तहसीलदार श्रीमती भारती सागरे,नायब तहसीलदार योगेश जमदाडे,गटविकास अधिकारी जे.टी.सूर्यवंशी,पोलीस उपनिरीक्षक बालाजी पद्मने,आदींसह जलसंपदा,विजवितरण कंपनी,ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अधिकारी,कर्मचारी यांनी धरण परिसरात युद्ब पातळीवर विजपंप शोधमोहीम राबवली.
त्यात कासारी येथील ट्रक्टर च्या सहाय्याने पाणी चोरी करत असल्याचे दिसून आल्याने ट्रक्टर जप्त करण्यात आला.तर धरणाच्या चार ही बाजुची पाहणी करून सुमारे ५५ विजपंप काढण्यात आले.माफी मांगणाऱ्या शेतकर्यांचे विजपंप तत्काळ परत करण्यात आले.तर विजपंप सोडून जे शेतकरी पळून गेले असे ८ विजपंप जप्त करण्यात आले.
दरम्यान अनेक वर्षापासून धरणात विजपंप टाकलेले असल्याने हे पंप सहजासहजी निघत नव्हते.म्हणून या शेतकऱ्यांना नायब तहसीलदार जमदाडे, पोलीस उपनिरीक्षक पद्मने,तलाठी वर्ग,पंचायत समितीचे कर्मचारी,जलसंपदा विभागाचे कर्मचारी स्वतः कष्ट घेत असल्याचे चित्र यावेळी दिसून आले.
प्रतिक्रिया-: श्रीमती भारती सागरे,तहसीलदार
तालुक्यात पिण्याच्या पाण्याची इतकी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.जे चोरुन वापरत आहेत,त्यांना ही उद्या हेच पाणी पिण्यासाठी लागणार आहे,ही वस्तुस्थिती असताना ही असा प्रकार घडत आहेत.यापुढे कड़क कारवाई केली जाणार आहे.
Comments
Post a Comment