सा.क्रांतिवीर........तालुका भाजपकडून संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा.!

            नांदगाव-: संतोष कांदे
तालुका भारतीय जनता पक्षाकडून संविधान उद्दीशिकेचे वाचन,मुख्यमंत्री ना.फडणवीस यांच्या संदेशाचे वाचन,संविधान ग्रंथ भेट अशा विविध उपक्रमांनी संविधान दिन साजरा करण्यात आला.
      सी.एम.चषक संयोजक व युवा मोर्चा आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप तालुकाध्यक्ष दत्तराज छाजेड होते,तर प्रमुख पाहुणे म्हणून रिपाइंचे जिल्हा कार्याध्यक्ष देविदास मोरे,तालुका प्रमुख राजाभाऊ पवार,युवा अध्यक्ष कपिल तेलुरे यांची उपस्थिती लाभली.व्यासपीठावर भाजप शहराध्यक्ष उमेश उगले,सावता परिषद जिल्हाध्यक्ष कृष्णा त्रिभुवन,उपस्थित होते.
     तालुक्यातील बोलठाण,जातेगाव, मांडवड, पिंप्राळे, जळगाव खुर्द,भालुर,शहरातील विवेकानंद नगर येथे संविधान दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.यावेळी संविधान उद्दीशिकेचे वाचन,रिपाई कडून संविधान ग्रंथ भेट,तसेच मुख्यमंत्री ना.फडणवीस यांच्या संदेशाचे वाचन यावेळी करण्यात आले.
     कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक स्वप्नील शिंदे यांनी केले तर सूत्रसंचालन युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विनोद अहिरे,यांनी केले.आभारप्रदर्शन युवा मोर्चाचे अमोल पवार यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ