सा.क्रांतिवीर..भालूर ग्रामपंचायत एक आदर्श उपक्रम साजरा

नांदगाव:- संतोष कांदे
स्वच्छता आणि आरोग्य या मधील असलेला निकटचा संबंध ; ग्रामस्थांना पटवून देण्यासाठी दिपोत्सव स्वच्छतेचा.! असा आगळा-वेगळा कार्यक्रम भालूर ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप आहेर यांच्या मदतीने आज राबवला.
      वर्षातील महत्वाचा सण म्हणजे दिवाळी...या अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या सणाच्या निमित्ताने म्हणा किंवा प्रतिकात्मक आधार घेत ग्रामस्थांना स्वच्छतेकडून आरोग्याकडे नेण्यासाठी भालूर ग्रामपंचायतीने भक्कम पाऊल उचलले आहे.शौचालयासमोर सडा - रांगोळी काढुन व शौचालयाचे पुजन,व पणतीची ज्योत प्रज्वलित करुन शौचालयाचा शाश्वत वापर करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केला.
       या अभिनव उपक्रमासाठी सरपंच  संदीप आहेर, उपसरपंच लक्ष्मीबाई निकम,व ग्रामसेवक वाय एस.निकम यांनी या कामी पुढाकार घेतला,या उपक्रमाला ग्रामस्थांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नरेश गिते ,पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गटविकास अधिकारी जे.टी.सुर्यवंशी,यांनी नियोजन केले.
       जिल्हा परिषदचे माहिती व संवाद तज्ञ रवि बराथे यांच्या संकल्पनेतुन हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी पंचायत समितीचे गट समन्वयक सुनिल पाटणकर, समुह समन्वयक सुरेश सवाखंडे,वाल्ह्याबाई आरसुळे,सुभाष कडलग,बाबासाहेब आहेर,सुकदेव आरसुळे,ताराबाई सोळसे,चहाबाई आरसुळे,लक्ष्मीबाई सोळसे तसेच ग्रा.पं.कर्मचारी मच्छिंद्र उशिर,सुनिल पवार,नाना.साठे,व ज्ञानेश्वर गांगुर्डे आदी कार्यक्रमास उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ