सा. क्रांतिवीर..सुमित गुप्ता यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा.!

गोरगरीब महिलांना वस्त्रदान करून सामाजिक जबाबदारी निभावण्याचा प्रयत्न

           नांदगाव-: संतोष कांदे

   नांदगाव शहरातील काही युवकांचा समाजकार्यातला उत्साह अनेकांना प्रेरणा देत असतो.प्रसंगी पदरमोड करून त्यांची धडपड वाखाणण्याजोगी असते.गणेशोत्सव किंवा अन्य उत्सव निमित्ताने अनेक लोकोपयोगी उपक्रम ते राबवत असतात.असाच काहीसा उपक्रम शिवसंस्कार बहुउद्देशीय संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुमित गुप्ता यांनी गुरू नानक जयंती व आपल्या वाढदिवस निमित्त गोरगरीब महिलांना साडी वाटप करत राबवला.
         शहरातील देवी गल्ली मागासवर्गीय वनवासी समाज भिलाटी येथे आज शिवसंस्कार बहुउद्देशीय संस्था व जायंटस् ग्रुप ऑफ नांदगांव यांच्या वतीने महिलांना साड्या वाटप करण्यात आल्या. सर्व महिलांनी आशिर्वाद दिले.याप्रसंगी रंगनाथ चव्हाण, नरेंद्र पारख, वामन पोतदार, श्रावण आडाव, यांनी आपले मत व्यक्त केले तर मेजर जगन्नाथ साळूके यांनी सूत्रसंचालन केले.
   यावेळी अध्यक्ष सुमित गुप्ता, डाँ. गणेश चव्हाण, नंदलाल वर्मा, पापा सय्यद, प्रकाश ढगे, हेंमत पवार, शोएब शेख, सलमान पठाण, संजय मोकळ, राजकुमार संत, रमनलाल लोढा, अनिल धामणे, योगेश जाधव, शिवाजी खेरणार, रघुनाथ मोकळ आदी नागरिक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ