सा. क्रांतिवीर..जेथे रचले जाते सरण..तेथे कापला केक.!

सामाजिक कार्याचा असाही आदर्श...वाढदिवस कार्यक्रमातून अंधश्रद्धा निर्मूलनाचा जागर.

             नांदगाव-: संतोष कांदे
  
रात्री सोडाच ; पण जेथे दिवसा ही जाण्याचे अनामिक भीतीने जाण्याचे टाळले जाते,ते ही सर्वांना याची लख्ख कल्पना आहे,की शेवटी येथेच यायचे आहे.तरीही स्मशानभूमीत वाढदिवस साजरा करून प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते संजय मोकळ यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचा अनोखा संदेश दिला.
      याबाबत अधिक असे की, शहरातील अनेक सामाजिक उपक्रमात मोकळ यांचा सहभाग ठरलेला असतो.तर वाढदिवस म्हणजे कुटुंब..मित्रांमध्ये साजरा करण्याचा दिवस असूनही त्यांनी यात सामाजिक जबाबदारी ओळखून यात ही समाज हितच बघितले.
शहरातील शाकंबरी नदीवरील स्मशान भूमीत संजयदादा मोकळ मित्र मंडळ व जायंटस् ग्रुप ऑफ नांदगांव तर्फे स्मशान भूमीत आगळा वेगळा वाढ दिवस साजरा करण्यात आला.
        सर्वात प्रथम आलेल्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वल करण्यात आले. स्मशान भूमीतील स्मशान जोगीच्या कुटूंबातील आई ने संजय मोकळला ओवाळले. नंतर संजयदादा मोकळ यांनी स्मशान भूमीतील म्हसनजोगी यांना सहकुटूंब कपडे, फराळ, पेढे देऊन व पाय उडून आशिर्वाद घेतले. जेष्ठ रंगनाथ चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक बजरंग चौघुले,नरेंद्र पारख, पारोळे सर, वामन पोतदार, सुमित गुप्ता,संदीप जेजुरकर,मनोज चोपडे, कपिल तेलोरे, मेजर जगन्नाथ साळूके, रमणलाल लोढा, विशाल वडघुले, भगिरथ जेजुरकर, ऋषी जाधव या वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रातील आलेल्या मान्यवरानी थोडक्यात आपल्या शूभेच्छा व्यक्त केल्या.
        संजय मोकळ यांनी सामाजिक क्षेत्रावर मनोगत झाले. त्यानंतर आलेल्या सर्व सामाजिक संस्था व मित्रांनी सत्कार केले. यावेळेस शिवसंस्कार बहुउद्देशीय संस्था, नरेंद्र नगर वसाहत मंडळ,पी.एल. ग्रुप, भगवान सोनवणे, गौतम पवार, प्रकाश ढगे, सुमित सोनवणे, दत्तात्रय सावंत, हर्ष मोकळ, चडाले दादा, गोपी जाधव सर्व मित्र परिवार उपस्थित होते. मेजर जगन्नाथ व सुमित गुप्ता यांनी सूत्रसंचालन केले.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ