सा.क्रांतिवीर..स्व.बागमार समाजभूषण पुरस्कार ; नांदगावच्या सहा जणांचा होणार सन्मान.!

सुमित गुप्तांसह,सुमित सोनवणे,प्रफुल्ल पारख यांचा ही समावेश

  नांदगाव-: संतोष कांदे
       अखिल भारतीय मारवाड़ी गुजराती मंचातर्फे समाजात उल्लेखनीय कर्तव्य बजावत असलेल्या व्यक्तींना प्रसिद्ध उद्योगपती स्व.हुकुमचंद बागमार समाज भूषण पुरस्काराने गौरवण्यात येते.यंदा शहरातील सहा मान्यवरांचा गौरव या पुरस्काराने होणार आहे.
        या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.अजित बागमार यांनी या पुरस्काराची घोषणा केली,तर नाशिक शहरात दि.४ नोव्हेंबर रोजी   प.सा. नाटयगृहात केंद्रीय राज्यमंत्री ना. श्रीपाद नाईक व राज्यमंत्री ना.दादाजी भूसे यांचे शुभ हस्ते सदर पुरस्कार देण्यात येणार आहेत.
       या पुरस्कार्थी मध्ये जायंट्स ग्रूपचे महाराष्ट्र अध्यक्ष मेजर जगन्नाथ साळुंके, उद्योगपती रमनलाल लोढ़ा व प्रफुल्ल पारख, युवा समाजसेवक सुमित गुप्ता व सुमित सोनवणे,महिला सामाजिक कार्यकर्ता स्मिता दंडगव्हाळ यांचा समावेश आहे. त्यांच्या निवड़ी बद्दल नांदगावकरांनी आनंद व्यक्त करून अभिनंदन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ