सा.क्रांतिवीर..महामंडलेश्वर शांतिगिरी महाराजांची श्री.क्षेत्र नस्तनपुरला भेट.!
महाराजांनी यावेळी केली आरती,संस्थानचे जनरल सेक्रेटरी अँड. अनिल आहेर यांची उपस्थिती
नांदगांव-: संतोष कांदे
संत श्री.सद्गुरु जनार्दन स्वामी यांचे वारसदार १००८ महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज यांनी तालुक्यातील नस्तनपुर येथील श्री.शनि महाराज मंदिराला भेट दिली.यावेळी त्यांनी श्री.शनि देवाची विधिवत पूजा करत आरती ही केली.
यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात संस्थानच्या वतीने शांतिगिरी महाराज यांचा जनरल सेक्रेटरी तथा माजी आमदार अँड. अनिल आहेर यांनी त्यांचा सत्कार केला.तर येत्या काही दिवसात औरंगाबाद जिल्ह्यातील वेरुळ येथे होत असलेल्या जय बाबाजी धर्म संस्कार सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील भक्त परिवाराची बैठक यावेळी घेण्यात आली.
त्यात या सोहळयाचे नियोजन करून जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शांतिगिरी महाराज यांच्या वतीने करण्यात आले.जय बाबाजी भक्त परिवाराकडून उपस्थित माजी आमदार अँड. अनिल आहेर,बाजार समितीचे माजी उपसभापती उदयअप्पा पवार,पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष कांदे यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी संस्थानचे विश्वस्त खासेराव सुर्वे,चांदोऱ्याचे सरपंच हरेश्वर सुर्वे,सागर सालुंके,मंदिराचे पुजारी अविनाश कुलकर्णी,राहुल चौधरी,सुनील पवार आदिंसह जय बाबाजी भक्त परिवार (पुरुष व महिला)नांदगाव तालुका, पंचक्रोशीतील मंडळी, व महाराजांन बरोबर आलेले अतिथी गण उपस्थित होते
Comments
Post a Comment