सा.क्रांतिवीर..माणसातील माणुसकी टिकवण्याचा प्रयत्न.!

नांदगाव-: संतोष कांदे
   भाऊ,भावाचा वैरी झाल्याच्या काळात काही सामाजिक संघटना मात्र माणसातील माणुसकी टिकवण्याचा कसोशीने प्रयत्न करताना दिसतात.त्यात नांदगाव शहरातील युवा फाउंडेशनचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.आणि या सामाजिक कार्याचे उदघाते आहेत संस्थापक सुमित सोनवणे .!
        दीपावली हा दिव्यांचा सण.! अनेक प्रत्यक्ष,अप्रत्यक्ष संकटांनी जीवनात अंधार पसरला असेल तर या दिव्यांनी प्रतिकात्मक लख्ख उजेड जीवनात पसरवा,हा हेतू कदाचित या युवा फाउंडेशन सारख्या संघटना राबवत असाव्यात.यंदा ही तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेवून 'दिवाळी एक हात मदतीचा' ही संकल्पना घेऊन तिसऱ्यांदा ही संघटना सक्रिय झाली आहे.
      दिवाळी साठी नवीन कपडे घेऊन सण साजरा करणाऱ्या समाजातील धुरीणांनी आपल्या कडील जुने सर्व प्रकारचे कपडे दान करावेत,जेणेकरून हेच कपडे निर्धन कुटुंबाना देऊन निदान त्यांना कपडे घालावयास मिळाल्याचा आनंद दिवाळी सणाचा आनंद द्विगुणित करेल.यासाठी युवा फाउंडेशन व शहरातील नामांकित शैक्षणिक संस्था व्ही.जे.हायस्कुल येथे हे कपडे जमा करता येतील.असे सुमित सोनवणे यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ