सा.क्रांतिवीर..शिवसंस्कार संस्थेच्या धडपडीतुन अनेक गरीब कुटुंबाच्या घरात चुली ऐवजी गॅस .!
नांदगांव-: संतोष कांदे
अपुऱ्या माहीती व पुरेशा जनजागृती अभावी अनेक शासकीय योजना गोरगरीब जनतेपर्यंत पोहचत नाहीत.परिणामी त्यांना वंचित रहावे लागते.या समाजहिताच्या बाबीचा विचार करून शहरातील शिवसंस्कार बहुउद्देशीय संस्थेने केंद्र शासनाच्या पंतप्रधान उज्वला गॅस या योजनेअंतर्गत आदिवासी नागरिकांना मोफत गॅस मिळवून देणेकामी महत्वपूर्ण भूमिका बजावली.अन या कुटुंबात खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी झाली.
शहरातील देवी गल्ली, प्राथमिक शाळा नंबर-३, लक्ष्मी आई मंदिर जवळील मागसवर्गीय भिल्ल वस्तीतील दारिद्र्यरेषेखालील व अंत्योदय ग्रामस्थांना या योजनेअंतर्गत 'सायली' गॅस डिस्ट्रिब्यूटर्स कडून सदर मोफत गॅसचे शिवसंस्कार बहुउद्देशीय संस्थेच्या पदाधिकाऱ्यानी भाऊबीजेच्या दिवशी वितरण केले.
यावेळेस संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुमित गुप्ता, मेजर जगन्नाथ साळूके, जेष्ठ रंगनाथ चव्हाण, पापा सय्यद, संतोष भोयटे, अनिल धामने, योगेश जाधव, आण्णा कंदीलकर, शकुंतला शिंदे, उज्वला भोयटे, सुमन पवार, कुसुम मोरे, वर्षा गांगुर्दे, संगीता मोरे आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment