सा. क्रांतिवीर..ढेकु खुर्द येथे 'हर घर बिजली' चा उजेड.!
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष भाऊसाहेब यांचे प्रयत्न,आणि ११० घरात पसरला प्रकाश..
नांदगांव-: संतोष कांदे
केंद्र व राज्य शासन अनेक जनकल्याणकारी योजना राबवत असतात,मात्र ज्यांच्यासाठी असतात,नेमक्या त्यांना त्या माहीत नसतात,तर ज्यांना माहीत असतात,त्यांना लाभ होणार नसल्याने काही घेणे-देणे नसते.मात्र तरीही काही राजकारण करता-करता असे समाजकारण करत असतात.अगदी असेच उदाहरण नांदगांव तालुक्याच्या घाटमाथ्यावरील ढेकू खुर्द येथे नुकतेच घडले.
केंद्र शासन व वीज वितरण कंपनीच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री सौभाग्य योजनेअंतर्गत ढेकू खुर्द येथील ११० ग्रामस्थांना मोफत वीज जोड़णी देण्यात आली.त्यात मीटर, वायर,लाकड़ी बोर्ड,फ्यूज आदी साहित्याचा समावेश होता.
याप्रसंगी पोलीस पाटील साहेबराव गायके,सरपंच सौ.ज्योती सुर्यवंशी,अंबादास गायके,शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष संदिप सुर्यवंशी,तातेराव गायके,सोपन चव्हाण,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे भाऊसाहेब सुर्यवंशी वायरमन श्री पगारे आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment