सा.क्रांतिवीर...अखेर रस्ता दुरुस्ती झाली.!
इफेक्ट बातमी चा.!
नांदगाव-: संतोष कांदे
नांदगाव ते औरंगाबाद (राज्य रस्ता क्र-१६) मार्गावरील खड्डे बुजवण्याचे महत्वपूर्ण काम करणाऱ्या ग्रामस्थांचे सचित्र वृत्त फक्त सा.क्रांतिवीर ने प्रसिद्ध केल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण चे अधीक्षक अभियंता माळोदे यांच्या आदेशाने सदर खड्डे बुजवण्यात आले आहेत.
या मार्गावरील चाळीसगाव फाटा ते जळगाव बुद्रुक फाटा या अंतरातील खड्डे या रस्त्यालगत वास्तव्य करून असलेल्या शेतकऱ्यांनी 'प्रत्येकाचा जीव अमूल्य आहे.या भावनेतून टिकाव,फावडे हाती घेत या रस्त्याची दुरुस्ती आपल्या परीने करण्याचा प्रयत्न केला होता.त्याचे सचित्र वृत्त सा.क्रांतिवीर ने प्रसिद्ध केले होते,मात्र डांबर उपलब्ध झाल्यानंतर लगेचच आज सर्व खड्डे बुजवण्यात आले आहेत.
Comments
Post a Comment