सा. क्रांतिवीर..गांधी सप्ताह निमित्त विविध उपक्रम
नांदगाव-: संतोष कांदे
येथील मविप्र संस्थेच्या
कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात म.गांधी जयंती सप्ताहात महाविद्यालयात विविध उपक्रम राबविण्यात येत असुन महाविद्यालय परिसरात राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत महाविद्यालयातील स्वयंसेवकांनी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.आय.पटेल यांनी स्वत: खराटा हातात घेवुन परिसर स्वच्छते साठी पुढाकार घेतला यावेळी कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख प्रा.आर.टी.देवर,कार्यक्रम अधिकारी प्रा.आर.एल.दिवटे,प्रा.दुधमल,प्रा.श्रीमती प्रतिभा जाधव,प्रा.श्रीमती एस.जी.कांदळकर,प्रा.श्रीमती जी.जे.सावळे प्रा.बी.एम.जाधव,प्रा.दिनेश उकिर्डे प्रा.सी.डी काटे ,प्रा.व्ही.पी.गढरी,प्रा.मापारी,प्रा.वाकचौरे,आदि उपस्थित होते यावेळी प्रा.सुरेश नारायणे यांनी उपस्थित स्वयंसेवक व प्राध्यापक तसेच महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी यांना स्वच्छते बाबतची व परिसर,गाव, कॉलनीत प्रचार प्रसार करण्यासाठीची शपथ देण्यात आली आपले आरोग्य निरोगी राहाण्यासाठी परिसर स्वच्छ असणे फार महत्त्वाचे आहे असे अध्यक्षीय भाषणात प्राचार्य म्हणाले व महाविद्यालय परिसर स्वच्छता मोहीम स्वयंसेवकांनी राबवुन परिसर स्वच्छ केला या सप्ताहात शुक्रवार व शनिवार या दिवशी म.गांधी रिसर्च फाऊंडेशन जळगाव संस्थेच्या वतीने म.गांधीच्या जीवनावर आधारित सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात येणार असुन शनिवारी या सप्ताहाची सांगता राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे केली जाणार आहे.
Comments
Post a Comment