सा. क्रांतिवीर...राष्ट्रवादीचा भार एकट्या संतोष अण्णांवर...
नांदगाव-: संतोष कांदे
राष्ट्रवादी पक्ष ज्यावेळी सत्तेत होता,आणि आमदारकीच्या दृष्टिकोनातून आजही सत्तेत आहे,मात्र खुद्द आमदारच तालुक्यात काही वेळाच हजर राहत असल्याने कार्यकर्ते दुरावले (की फायद्यासाठी बाजूला गेले आहेत.?) आहेत. मात्र असे असताना तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता निष्ठेने पक्षाचे कार्य म्हणून गावागावात जाऊन पक्ष वाढीसाठी झटताना दिसत आहेत.
तालुक्यातील मूळडोंगरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढविण्याच्या व सक्षम करण्याच्या निर्धाराने कार्यकर्त्यांची भेट घेऊन पक्ष बांधणी संदर्भात चर्चा केली.या बैठकीत गाव तेथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शाखा, गावपातळीवर कार्यकारणी निवडण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे जनावरांचा चारा, पिण्याचे पाणी व गावातील विकास कामांबाबात चर्चा झाली. या बैठकीला तालुका अध्यक्ष संतोष गुप्ता, भगवान गणपत मोरे, शिवाजी खंडू गवळी, गंभीर रावसाहेब मोरे, दिपक केशव कदम, वाडीलाल नंदू चव्हाण, अमोल दादासाहेब मोरे, प्रशांत संजय मोरे, अनिल एकनाथ सोनवणे, योगेश विठ्ठल मोरे, रमेश नथू राठोड, प्रकाश संगा जाधव, कैलास पोपट जाधव, किरण दादा नळ, संतोष सुदाम बागुल, रमेश भीमराव मोरे, भावराव राजाराम मोरे, बाबासाहेब देवराम मोरे, नरसिंग भासू चव्हाण, बाळासाहेब दत्तात्रय मोरे, काशिनाथ राघो चव्हाण, अरुण दशरथ मोरे, गोरख सदाशिव मोरे, सीताराम पोपट राठोड आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment