सा. क्रांतिवीर...राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष बांधणीवर जोर
नांदगाव-: संतोष कांदे
नांदगांव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढविण्याच्या व सक्षम करण्याच्या निर्धाराने प्रत्येक गावात जावून गावातील कार्यकर्त्यांची भेट घेऊन पक्ष बांधणी संदर्भात चर्चा केली जात आहे. त्याचाच भाग म्हणून न्यायडोंगरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक पार पडली.
या बैठकीत गाव तेथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शाखा, गावपातळीवर कार्यकारणी निवडण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच गावातील विकास कामांबाबात चर्चा झाली. या बैठकीला तालुका अध्यक्ष संतोष गुप्ता, कांतीलाल छाजेड,माजी सभापती राजेंद्र आहेर, नंदू आहेर, युनुस तांबोळी, पांडुरंग राठोड, मच्छिंद्र राठोड, रविंद्र सोमासे, अशोक हजारे, ज्ञानेश्वर राठोड, कैलास चव्हाण, संतोष शिंदे, विलास राठोड, अनिल राठोड, रविंद्र राठोड, समीर शहा, विश्वास आहेर, निंबा भिक्न्रावा आहेर, प्रविण वाघ, हर्षल चित्ते, शुभमपवार, रामचंद्र तांदुळकर, अविनाश वाघ, शंकर गवळी, बंडू गवळी, रुनाशेठगवळी, कुणाल गवळी, संजय जाधव, तुषार पाटील. आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment