सा.क्रांतिवीर..अखेर न्यायडोंगरी ग्रामपंचायतीवर भगवा फडकला.!
सा.क्रांतिवीर चे भाकीत खरे ठरले...विलास आहेर ठरले किंगमेकर...
नांदगाव-: संतोष कांदे
तालुक्यातील बहुचर्चित न्यायडोंगरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेनेचे संजय आहेर यांची बिनविरोध वर्णी लागली आहे.
या बाबत अधिक असे की,शिवसेनेच्या गायत्री मोरे यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर या रिक्त पदावर कोण विराजमान होणार .? याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात होते.काँग्रेसचे माजी आमदार अड.अनिल आहेर यांच्याकडे ५,विलास आहेर-५ आणि शशिकांत मोरे-५ असे बलाबल होते.आणि माजी आमदार अड.आहेर व शशिकांत मोरे यांच्यात दिलजमाई होऊन सरपंच पद मिळवले जाईल, अशी अटकळ काही जणांनी व्यक्त केली होती.मात्र अड.आहेर यांनी जनमताचा कौल तीन वर्षांपूर्वीच आपल्या विरोधात गेला असल्याची बाब स्पष्ट करत तटस्थ राहणे पसंत केले होते,मात्र त्यांचेच सदस्य फोडण्यात विलास आहेर यांनी यश मिळवले.
सरपंच पदी संजय आहेर यांना बिनविरोध निवडून आणण्याकामी उपसरपंच गोटीराम जाधव,दादा आहेर,अश्विनी आहेर,वैशाली चव्हाण,पारुबाई वाघ,भिकन सोनवणे,दुर्गा मगर,लक्ष्मण गायकवाड,उज्वला जैन,आदी ग्रामपंचायत सदस्यांनी बहुमोल मदत केली.
या निवड प्रसंगी शिवसेनेचे सर्वेसर्वा जिल्हाप्रमुख (ग्रामीण) सुहास कांदे यांच्यासह तालुक्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी,नगराध्यक्ष,दोन्ही बाजार समिती सभापती,पंचायत समिती सभापती,सदस्य,जिल्हा परिषद सदस्य,व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment