सा.क्रांतिवीर..उन्नत भारत अभियान साठी नांदगाव महाविद्यालयाची निवड

नांदगाव-: संतोष कांदे
    महात्मा गांधींच्या "खेड्याकडे चला "या संकल्पनेला अनुसरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उन्नत भारत अभियान ही महत्वाकांक्षी योजना मांडली आहे.त्या अंतर्गत येथील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची निवड करण्यात आली आहे.
         शहरांप्रमाणेच खेड्यांचाही विकास व्हावा,यासाठी देशातील उच्च शिक्षण संस्था,महाविद्यालये व विद्यापिठांकडुन केंद्र शासनाने प्रस्ताव मागविले होते,केंद्रीय  मनुष्यबळ विकास मंत्रालय नवी दिल्ली  व आयआयटी दिल्ली यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या या अभियानांतर्गत निवड झालेल्या महाविद्यालयाने गिरणानगर,क्रांतीनगर,हिसवळ बुद्रुक, हिसवळ खुर्द,हिंगणवाडी या पाच गावांची  निवड केली आहे.
     या गावांतील अडचणी व समस्या सोडविण्यासाठी महाविद्यालयातील  प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी  विशेष  परिश्रम घेतील. व त्या गावाचा  विकास  करण्यासाठी प्रयत्नशील असतील  असे प्रतिपादन उन्नत भारत अभियान चे महाविद्यालयाचे समन्वयक  व राष्ट्रीय  सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी  प्रा.दिलीप   दुधमल यांनी या प्रसंगी केले.
        भारतरत्न  डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम  यांनी भारत महासत्ता  होईल असे स्वप्न पाहीले होते.भारतातील खेड्यांचा जोपर्यंत विकास होत नाही तोपर्यंत महासत्ता होण्याचे स्वप्न दुरच राहील म्हणूनच केंद्र सरकारने  उन्नत भारत  अभियान ही योजना राबविण्याची प्रकल्प हाती  घेतला आहे.सदर योजनेअंतर्गत स्वच्छ  भारत अभियान,हागणदारी मुक्त गाव,पाणीप्रश्न,बेटी बचाओ-बेटी पढाओ,गावकऱ्यांच्या आरोग्य तपासण्या,साथीच्या रोगांविषयी जनजागरण  इत्यादी गोष्टींवरही विशेष भर देण्यात येणार  असल्याचे प्राचार्य डॉ.एस.आय.पटेल  यांनी  सांगितले.राष्ट्रीय स्तरावर नांदगाव  महाविद्यालयाच्या या निवडीबद्दल मविप्रचे अध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे सरचिटणीस  निलीमाताई पवार,नांदगाव  तालुका संचालक  दिलीप पाटील,स्थानिक व्यवस्थापन कमिटी  अध्यक्ष सर्जेराव पाटील व व्यवस्थापन  समितीच्या  सदस्यांनी अभिनंदन  केले  आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ