सा.क्रांतिवीर...आता तरी सां.बा. विभागाला जाग येईल का.?
प्रवाश्यांचे जीव अमूल्य आहेत ; या भावनेने जळगाव बुद्रुक च्या ग्रामस्थांचे मूल्यवान कार्य..
नांदगाव-: संतोष कांदे
नांदगाव-औरंगाबाद राज्य रस्ता क्रमांक १६....नांदगाव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत....मात्र या रस्त्याची खड्डयांनी पार चाळण केलीय...तरीही या विभागाला 'कुंभकर्ण' निद्रेने घेरले की काय.? असा सवाल प्रवासी वर्ग करतोय.
या बाबत अधिक असे की,मालेगाव व मनमाड कडून येणाऱ्या वाहनांना जवळचा म्हणून नांदगाव-औरंगाबाद (राज्य रस्ता क्र-१६) हा आहे.या मार्गावर जागोजागी मोठं-मोठे खड्डे पडले आहेत.पावसाळ्यात संबंधित विभाग दुरुस्ती करत नाही,कारण डांबर तग धरत नाही म्हणून....मात्र यंदा पावसाने मृग नक्षत्रापासून जे डोळे वटारले ते आजतागायत बंद झाले नाही.आणि अशी परिस्थिती तालुक्याची असताना सार्वजनिक बांधकाम विभाग पावसाळा संपण्याची वाट बघतोय,असे चित्र या खड्ड्यांवरून दिसून येत आहे.
४० गावं फाटा ते जळगाव बुद्रुक फाटा या दोन किलोमीटर च्या अंतरात डजनावर खड्डे पडले आहेत.छोटी वाहने नादुरुस्त होण्याचे प्रमाण गणतीत नाही,मात्र हेच खड्डे गंभीर दुखापती सह जीवावर ही बेतू शकतात,आणि या खड्ड्यांची दुरुस्ती होत नसल्याने या परिसरात वास्तव्य करून असलेले सोसायटीचे माजी चेयरमन नामदेव गिते व युवा सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर बुरकुल यांनी प्रवाश्यांचा जीव अमूल्य आहे,ही जाणीव ठेवून या परिसरातल्या मोठं-मोठ्या खड्ड्यांची मातीने का होईना,दुरुस्ती करत आपले सामाजिक उत्तरदायित्व निभावण्याचा एक अल्पसा प्रयत्न सुरू केला आहे.
दरम्यान जळगाव (जिल्हा) ते चांदवड या मार्गाचे काँक्रीटीकरण काम सध्या वेगाने सुरू आहे,या कामानिमित्ताने संबंधित ठेकेदाराने हा रस्ता दुतर्फा खोदला आहे,आणि मधला रस्ता खड्डयांनी व्यापला आहे.मग वाहन चालवावे कसे.? असा प्रश्न साहजिकच वाहन चालकांना पडतो आहे.
Comments
Post a Comment