सा.क्रांतिवीर..बाधित शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई मिळावी-काँग्रेस तालुकाध्यक्ष पाटील.!

पालकमंत्री गिरीश महाजन यांना दिले निवेदन

नांदगाव-: संतोष कांदे
    तालुक्यात १९७२ सारखी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.पाऊस पडेल या भरवश्यावर कांदा व भाजीपाला पिकांची लागवड करण्यात आली,मात्र पदरात निराशाच पडल्याने एकरी खर्च केलेले ३०/३५ हजार रुपये अक्षरशः वाया गेले आहेत.त्यामुळे या पिकांचा पंचनामा करून या शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष समाधान पाटील यांनी एका निवेदनाद्वारे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री ना.गिरीश महाजन यांच्याकडे केली.
        या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की,तालुक्यात सद्यस्थितीत जी परिस्थिती निर्माण झाली आहे,ती निसर्ग निर्मित आहे,मात्र या अस्मानी संकटाने जगाचा पोशिंदा बळीराजा कोलमडून गेला आहे.त्याला या संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वांच्या एकत्रित मदतीची गरज आहे.त्यामुळे शासनाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ आर्थिक भरपाई देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा,असे या निवेदनात शेवटी म्हटले आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ