सा. क्रांतिवीर..इंधन दरवाढ रोखावी... शिवसेनेचा रस्त्यावर उतरण्याचा इशारा.!
नांदगाव-: संतोष कांदे
पेट्रोल व डिझेल दरवाढीने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे.आणि याची झळ देशाच्या १२५ कोटी जनतेला बसत असल्याने सत्तेत असूनही,शिवसेनेने सामान्य जनतेसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की,आधीच दुष्काळी परिस्थितीने गांजलेल्या जनतेला पेट्रोल जीएसटी च्या कक्षेत आणून दिलासा देणे गरजेचे असताना शासन याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहे,पेट्रोल जीएसटी च्या अंतर्गत आणावे व पेट्रोल,डिझेल ची किंमत कमी करावी,आणि ही सर्वसामान्य जनतेची मागणी शासनापर्यंत पोहचून दिलासा द्यावा.अन्यथा शिवसेना आपल्या स्टाईल ने उत्तर देईल.असा खणखणीत इशारा शेवटी देण्यात आला आहे.
या निवेदनावर शिवसेना जिल्हाप्रमुख सुहास कांदे,तालुका प्रमुख किरण देवरे,नगराध्यक्ष राजेश कवडे,पंचायत समिती सभापती विद्या पाटील,बाजार समिती सभापती तेज कवडे,माजी सभापती विलासराव आहेर,जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरसे,मनमाड बाजार समिती सभापती ऍड.गंगाधर बिडगर,उपसभापती गोरख सरोदे,माजी उपसभापती सुभाष कुटे, माजी नगराध्यक्ष सौ.कामिनी साळवे,शहर प्रमुख सुनील जाधव,माजी सभापती सौ.सुमन निकम,बाळासाहेब कवडे,नगरसेवक नितीन जाधव,भाऊसाहेब हिरे,भाऊसाहेब जाधव,रवींद्र पवार,पुंजाराम जाधव,उपसभापती सौ.आशा आहेर,आदींची नावे व सह्या आहेत.
Comments
Post a Comment