सा. क्रांतिवीर..मांडवड येथे उज्वला योजनेअंतर्गत गॅस वाटप
नांदगाव-: संतोष कांदे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व सामान्य जनतेच्या हितासाठी सुरू केलेल्या ऊज्वला योजनेच्या अंतर्गत मांडवड येथे लाभार्थ्यांना गॅस / शेगडी वाटप भाजप नेते तथा माजी आमदार संजय पवार यांचे हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी कर्ही येथील भारत गॅसचे संचालक दशरथ लहीरे यांच्यासह विठ्ठल आहेर,अशोक निकम,अनंत आहेर,नरहरी थेटे,दत्तु निकम, प्रकाश आहेर, आण्णा गडाख,बापू काजळॆ,सागर आहेर,माधव गडाख आदींसह ग्रामपंचायत,सोसायटी चे सदस्य,लाभार्थी,व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मनोगत व्यक्त करताना माजी आमदार पवार म्हणाले की, 'सबका साथ सबका विकास.! हे ब्रिद डोळ्यासमोर ठेवून काम सुरु आहे.सर्वानी पुढील काळात सहकार्य करावे.असे आवाहन त्यांनी शेवटी केले.तर संचालक लहिरे म्हणाले की, या योजनेचा लाभ आमदार पवार यांचे मार्गदर्शना खाली परीसरातील घराघरात पोहोचवू .
Comments
Post a Comment