सा.क्रांतिवीर..परम चैतन्य फाउंडेशन कडून समाजोपयोगी वस्तूंचे लोकार्पण.
नांदगाव-: संतोष कांदे
प्रत्येक व्यक्ती समाजाचे काही देणे लागतो या भावनेने सहज वेलफेयर,परम चैतन्य फाऊंडेशन, नांदगाव या संस्थेमार्फत अनेक सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.
दि.१३ रोजी शहरातील स्व.मिश्रीलाल भिकचंद छाजेड शाळेमध्ये परम चैतन्य फाऊंडेशन तर्फे वॉटर फिल्टर देण्यात आले,सदर शाळेमध्ये यापूर्वी धरणाचे पाणी जलकुंभात भरले जात असे.हे दूषित पाणी पिऊन मुलांना त्रास होण्याची शक्यता होती. ही त्यांची गरज ओळखून परम चैतन्य फाऊंडेशनने सदर शाळेला वॉटर फिल्टर देण्यात आला.याचा फायदा २०० च्या आसपास विद्यार्थी व शिक्षकांना होणार आहे.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अंडे मॅडम, शालेय समिती अध्यक्ष आंबेकर सर ,भाजप तालुकाध्यक्ष दत्तराज छाजेड,जेष्ठ पत्रकार संजीव धामणे, कार्याध्यक्ष भैय्यासाहेब चव्हाण व उपस्थित सर्व शिक्षक, कर्मचारी वर्ग, पालक व विद्यार्थी वर्ग हे सर्व उपस्थित होते.
यावेळी विविध सामाजिक संस्था व सामाजिक कार्याची आवड असणा-या सर्व व्यक्तींना आमच्या संस्थे तर्फे आवाहन करण्यात येत आहे की, सर्वांनी एकत्र येऊन या विकास कार्याला हातभार लावावा अशी विनंती संस्थेचे सचिव श्री सुनिल विसपुते, श्री घनश्याम कोळी, श्री महेश गायकवाड, श्री सागर फाटे, सौ. इंद्रायणी कचरे, श्रीमती जानकी सोनी अणि त्यांच्या सोबत आलेले सर्व सहकारी लोकांनी केली.
Comments
Post a Comment