सा.क्रांतिवीर..मनमाड उपजिल्हा रुग्णालयाला पाणी द्यावे.!

मनमाड शिवसेनेची आगार प्रमुखाकडे मागणी

नांदगाव-: संतोष कांदे

मनमाड शहरातील उपजिल्हा रुग्णालयात पाणी टंचाई अभावी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे,मात्र बस स्थानकात असलेल्या विहिरीला पुष्कळ पाणी असल्याने हे पाणी रुग्णालयाला पाईप लाईन द्वारे देवून दिलासा दयावा,अशी मागणी शहर शिवसेनेने सार्वजनिक बांधकाम विभाग व आगारप्रमुखांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
      उपजिल्हा रुग्णालयात सद्यस्थितीत पाणी नसल्याने डॉक्टर व रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.पाण्याची सर्वाधिक गरज रुग्णालयात भासते,मात्र पाणी नसल्याने सर्वच हवालदिल झाले आहेत.मात्र अशा परिस्थितीत शेजारी असलेल्या बसस्थानकाच्या विहिरीला मुबलक पाणी उपलब्ध आहे,आणि या विहिरीतून पाईप लाईन द्वारे शेजारीच असलेल्या उपजिल्हा रुग्णालयाला पाणी देणे सहज शक्य आहे.त्यामुळे सार्वजनिक हिताचा विचार करून रुग्णालयाला पाणी देण्याची तजवीज करावी.अशी मागणी शहर शिवसेनेने आगार प्रमुख श्री.लाडवंजारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.याच आशयाचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहायक अभियंता यांनाही देण्यात आले आहे.
     यावेळी शहर प्रमुख मयूर बोरसे,नगरसेवक कैलास गवळी,उपशहर प्रमुख प्रवीण धाकराव,शहर संघटक तथा रुग्णकल्याण समिती सदस्य महेंद्र गरुड,खालिद शेख यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ