सा.क्रांतिवीर..परम चैतन्य फाउंडेशन तर्फे ग्रामीण रुग्णालयात लोकोपयोगी वस्तूंचे वाटप

नांदगाव-: संतोष कांदे
     येथील शासकीय ग्रामीण रूग्णालयामध्ये नवजात शिशूंकरीता सहज वेलफेयर व परम चैतन्य फाउंडेशन तर्फे बेबी रँपरचे मोफत वाटप करण्यात आले.
         या रुग्णालयामध्ये दररोज ४ ते ५ बालकांचा जन्म होतो.त्यांना ऊब देण्यासाठी बेबी रॅपर ची अत्यंत आवश्यकता असते.मात्र वेळेवर उपलब्ध होत नाहीत,परिणामी नवजात शिशूला संसर्ग होण्याची शक्यता बळावते.म्हणून बेबी रॅपर चे मोफत वाटप करण्यात आले.शासकीय ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ.रोहन बोरसे यांनी वरील सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींचे आभार यावेळी मानले.
     नांदगाव-औरंगाबाद मार्गावरील निवासी गतिमंद शाळेच्या विद्यार्थ्यांना ब्लँकेट्सचे वाटप ही यावेळी करण्यात आले.या संस्थेचे संस्थापक मुकुंद शेवरे यांनी यापुढे ही असे समाजोपयोगी उपक्रम राबवणार असल्याचा मनोदय यावेळी व्यक्त केला.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ