सा.क्रांतिवीर..दोन महिलांच्या प्रयत्नामुळे चिंचविहीर गावाचा दुष्काळाला चकवा.!

तत्कालीन जिल्हा परिषद सदस्या सौ.आहेर व सरपंच सौ.नवले यांच्यामुळे गाव आजही पाणीदार.!
नांदगाव-: संतोष कांदे
  यंदा अत्यंत कमी पर्जन्यमान झाल्याने तालुका दुष्काळी घोषित झाला आहे,दुष्काळी उपाययोजना करण्याचे शासकीय पातळीवर अहवाल,निवेदने पोहचली आहेत,मात्र अशा परिस्थितीत याच तालुक्यातील चिंचविहीर गाव अपवाद ठरले आहे.या गावाने चक्क दुष्काळालाच चकवा दिला आहे.
     काही वर्षांपूर्वी न्यायडोंगरी गटाच्या जिल्हा परिषद सदस्या तथा माजी महिला व बालकल्याण सदस्या सौ.सुनिता अनिल आहेर यांनी जिल्हा परिषदकडून प्राप्त निधीतून या गाव परिसरात एका छोट्या नाल्यावर एक सिमेंट प्लग बंधारा बांधला.त्यावर्षी झालेल्या पहिल्याच पावसाने हा बंधारा पूर्ण भरून गेला.आणि नंतरच्या काळात याच पाण्यावर शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची भक्कम सोय झाली.
      ही बाब हेरून सरपंच सौ.कविता सुरेश नवले यांनी मग चिंचविहीर चा जलयुक्त शिवार योजनेत सहभाग नोंदवत गाव परिसरातल्या सर्वच छोट्या-मोठ्या नाल्यांवर जास्तीत जास्त सिमेंट प्लग बंधारे बांधून घेतले.आणि ह्या वर्षी जो काही अल्पसा पाऊस पडला,त्यात ही हे बंधारे भरून गेले आहेत.आणि अधिक प्रमाणात खडकांचे प्रमाण असल्याने या पाण्याचा गळती किंवा पाणी जिरण्याचा संबंध येत नसल्याने तालुक्यात सर्वत्र पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असताना या गावात सात-आठ बंधारे पूर्ण भरलेले आहेत.येथील जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न सुटला आहे.

   दरम्यान सरपंच सौ.नवले यांच्या या कामाची दखल घेऊन तत्कालीन विभागीय महसूल आयुक्त एकनाथ डवले यांनी 'जलयुक्त चे शंभर टक्के काम करून प्रथम क्रमांक पटकवल्याचे घोषित करून त्यांचा नाशिक येथे जाहीर ही केला होता.
    

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ