सा.क्रांतिवीर..गोदावरी एक्स्प्रेस ची सेवा पूर्वतत करावी,न केल्यास आंदोलन.!

मनमाड शहर शिवसेनेचा इशारा

नांदगाव-: संतोष कांदे
    १९ ऑक्टोबर पासून मेगा ब्लॉक असल्याच्या कारणाने गोदावरी एक्स्प्रेस व मुंबई-भुसावळ पॅसेंजर ची सेवा बंद करण्यात आली.१३ दिवस उलटून गेले तरी सेवा सुरू होत नसल्याने या गाडीने नियमित प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांचे अतोनात हाल होत आहेत.त्यामुळे लवकरात लवकर ह्या दोन गाड्या सुरू करून प्रवाश्यांना दिलासा द्यावा,अशी मागणी मनमाड शहर शिवसेनेने केली आहे.असे न केल्यास आंदोलन छेडले जाईल असेही पुढे म्हटले आहे.
      मध्ये रेल्वेचे वरिष्ठ डी.सी.एम सुनील मिश्रा,डी.ओ.एम.डॉ.सुशील नीला यांना दिलेल्या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की,मनमाड शहरासह तालुक्यातून नोकरी,व्यवसाय व अन्य कारणाने नाशिक,मुंबई येथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे.आणि गाड्यांचा नियमित प्रवास अंगवळणी पडला आहे.किंबहुना या गाडी शी एक वेगळीच नाळ जुळली असल्या कारणाने या गाडीचा दुरावा सहन होत नाही.
      तरी हा मेगा ब्लॉक लवकरात लवकर संपवून गाडीची सेवा पूर्वतत करावी,अन्यथा शिवसेना आंदोलन छेडेल, त्या वेळी कायदा-सुव्यवस्था बिघडली तर त्याची संपूर्ण जबाबदारी मध्य रेल्वेची असेल असा इशारा ही देण्यात आला आहे.
    या निवेदनावर शिवसेना शहरप्रमुख मयुर बोरसे,संतोष जगताप-वि.संघटक, सजंय कटारिया-ता संघटक,उपशहरप्रमुख प्रविण धाकराव, शहरसंघटक महेंद्र गरुड़, नीलेश ताठे, युवासेना शहरचिटनीस स्वराज देशमुख,सुभाष माळवतकर,सार्थक महाले,आनंद दरगुडे,सोहेल पटेल आदींची नावे व सह्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ