सा.क्रांतिवीर.. जे.टी.के.व के.एम.के.विद्यालयाच्या ६ विद्यार्थ्यांची निवड.!
नांदगाव-: संतोष कांदे
जिल्हा स्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत जे.टी.के.इंग्लिश मिडीयम स्कूल व सौ. के.एम.के.माध्यमिक विद्यालयाचे ६ खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
दि. २० व २१ ऑगस्ट रोजी नासिक येथे झालेल्या जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत सौ. के.एम. के. विद्यालयाच्या १४ वर्ष आतील मुलींच्या संघाने अंतिम फेरीत दिल्ली पब्लिक स्कूल विरूध्द अटीतटीची झुंज दिली व उपविजयी ठरले.संघातील साक्षी सानप,व तनिष्का पाटील यांनी अप्रतिम खेळाचे
प्रदर्शन करीत विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरले.
त्याचप्रमाणे जे. टी.के. इंग्लिश मिडीयम चा मुलांच्या संघाने (१४ वर्ष आतील) अंतिम सामन्यात अप्रतिम खेळ करीत विसडम इंग्लिश मिडीयम संघा विरूध्द अटीतटीची झुंज दिली व उपविजयी ठरले.सचिन मोहिते व पुयूष पारखे यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली .
आज झालेल्या १७ वर्ष आतील गटामध्ये के. एम. के. माध्यमिक विद्यालयाच्या मुलींच्या संघाने अंतिम फेरीत धडक दिली व देवळाली संघाविरुध्द उपविजयी ठरले. संघातील आदिती हिरे व मानसी डफाळ यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.
त्याच प्रमाणे जे. टी. के. इंग्लिश मिडीयम चा मुलांच्या संघाने उपांत्य फेरी पर्यंत झुंज दिली परंतु नासिक संघाविरूध्द हार पत्करावा लागली.
सर्व यशस्वी खेळाडूंचे आणि क्रीडा शिक्षक बागूल व त्रिभूवन यांचे संस्थेचे अध्यक्ष सुनिल कासलीवाल,उपाध्यक्ष रमणलाल कासलीवाल,सचिव विजय चोपडा,सहसचिव सौ.प्रमिला कासलीवाल,रिखबचंद कासलीवाल,जूगलकिशोर अग्रवाल,विजय कासलीवाल,सूशिल कासलीवाल,दिलीप पारख,श्रीमती कमला कासलीवाल,महेंद्र चांदीवाल,प्रशासक श्री. गुप्ता,मुख्याध्यापक राजेंद्र खरोटे,प्राचार्या सौ. रेणू पिल्ले व शिक्षकांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment