सा.क्रांतिवीर..स्व.अण्णासाहेब आहेर आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे क्रीडा स्पर्धेत यश.!

नांदगाव-: संतोष कांदे
    तालुक्यातील न्यायडोंगरी येथील लोकनेते स्व.गंगाधर शिवराम आहेर आदिवासी अनुदानित आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी सटाणा तालुक्यातील हरणबारी (ताराहबाद) येथील प्रकल्पस्तरीय स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले.
          या क्रिडा स्पर्धामध्ये यंदा कु.सचिन वळवी व कु.ऐलदी वळवी या दोन खेळाडूंनी १४ वर्ष व १९ वर्ष वयोगटात १०० मीटर , २०० मीटर मध्ये सूवर्णपदकांची कमाई केली.तसेच बाकी सहभागी खेळाडूंनी ४०० मीटर ६०० मीटर , १५०० मीटर इ.सर्व प्रकारांत तृतीय क्रमांक राखला.
       नाशिक येथे होणाऱ्या पुढील विभागस्तरीय स्पर्धांसाठी आपला प्रवेश निश्चित केला. विजयी खेळाडूंचे संघ व्यवस्थापक, मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग तसेच शनैश्वर सेवाभावी संस्था सरचिटणीस तथा माजी आमदार अड.अनिल आहेर यांनी कौतूक करून शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ