सा.क्रांतिवीर...वडाळी बुद्रुक विकासो.च्या अध्यक्षपदी सिताराम सानप बिनविरोध.!

नांदगाव-: संतोष कांदे

नांदगाव तालुक्यातील वडाळी बुद्रुक विविध कार्यकारी संस्थेच्या अध्यक्षपदी सिताराम सानप यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
     ठरलेल्या आवर्तनानुसार मावळते अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या या पदावर सर्वानुमते सदस्य सिताराम सानप यांच्या नावावर एकमत झाल्याने आज त्यांची अध्यक्षपदी निवड केल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी एस. के.सोनवणे यांनी केली.त्यांना सचिव शिवाजी लव्हाटे यांनी सहाय्य केले.
      गुलालाची उधळण करून आनंद व्यक्त करण्यात आला.याप्रसंगी वडाळी बुद्रुक चे सरपंच बाबासाहेब नंद,प्रफुल्ल पारख,दिलीप पारख,काळू सानप,संचालक चंद्रभान कोरडे,शांताराम साळुंके,मनोज चोपडा,दत्तात्रय बैरागी,गणेश नंद,रावसाहेब डफाळ,पंडित घोलप,रघुनाथ राजोळे, बाळासाहेब सानप,बळीराम टोनपे, कमलाबाई कोरडे,ताराबाई पाटील,यांच्यासह कैलास नंद,रामदास सानप,वाल्मिक सानप,महेंद्र कोरडे,बाळू नंद,भाऊसाहेब पाटील,मनोज कोरडे,अतुल कोरडे,मनोज राजुळे,सतीश सानप,अमोल सानप उपस्थित होते.
      

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ