सा.क्रांतिवीर...९४ वर्षाच्या आजी ही चक्क चालू लागल्या..

डॉ.कविता कातकडे व डॉ.शांताराम कातकडे यांची कमाल...अग्रवाल परिवारासाठी ते ठरले देवदूत...

नांदगाव-: संतोष कांदे
शहरातील अग्रवाल कुटुंबातील ९४ वर्षीय आजींची यशस्वी शस्त्रक्रिया करून मनमाड शहरातील डॉ.कातकडे देवदूत च ठरले..असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.
        या बाबत अधिक असे की,गांधी चौकातील ज्योतिप्रसाद अग्रवाल किराणा मालाचे नामांकीत व्यापारी..त्यांना नशिबानेच दोन आईंचा सहवास प्राप्त झाला आहे.मोठा परिवार असलेल्या या कुटुंबातील ज्योतिप्रसाद यांच्या सावत्र आई म्हणजेच अन्नपूर्णा अग्रवाल ह्या होय..त्यांचे वय ही नव्वदीच्या पुढे गेल्याने त्यांचे शरीर तसे तकलादू च झालेले ..तशातच त्यांच्या पाठीच्या कण्यांनी साथ सोडली.अन त्या अंथरुणावर खिळल्या.मात्र रोज आईच्या वेदना मग ती सावत्र का असेना.!,ज्योतीप्रसाद यांना सहन होत नव्हत्या.
      त्यांच्या भावासह घरात दोन ते तीन डॉक्टर आहेत.आणि त्यांचा सल्ला ही 'आता ह्या वयात आईचे कसले ऑपरेशन.? असाच होता,मात्र ज्योतिप्रसाद यांनी हार न मानता मनमाड शहरातील प्रसिद्ध डॉ.शांताराम कातकडे यांच्याकडे धाव घेतली.त्यांनीही या आईचे वय बघता प्रथम नकार घंटाच वाजवली.मात्र अग्रवाल कुटुंबाच्या खास आग्रहास्तव ते शस्त्रक्रिया करण्यास तयार झाले.आणि काय नवल.! या ९४ वर्षीय आजींवर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांची रोजच्या वेदनेतून मुक्तता केलीच ; पण त्यांना आता चालणे ही शक्य होणार आहे.
       प्रतिक्रिया-: ज्योतिप्रसाद अग्रवाल, डॉ.कातकडे हे आमच्या अग्रवाल कुटुंबासाठी देवदूत च ठरले आहेत.ज्या मातेने जन्म दिला,तिच्या वेदना ज्यांनी थांबवल्या, ते आमच्या साठी देवतुल्य च आहेत.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ