सा. क्रांतिवीर..महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री जयंती मोठ्या उत्साहात साजरी
नांदगाव -: संतोष कांदे
महात्मा गांधी यांनी सत्य,अहिंसा या मार्गाचे आपल्या जीवनात आचरण केले,व भारतीय समाजाला प्रगती साधायची असेल तर प्रत्येकाने या तत्वांचा वापर केल्यास नक्कीच समाज उन्नती घडेल असे विचार प्रा.सुरेश नारायणे यांनी मांडले. शहरातील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंती प्रसंगी आयोजित महात्मा गांधी विचार व समाज या विषयावर ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ.एस.आय.पटेल,कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.आर.टी.देवरे,प्रा.व्ही.पी.गढरी,प्रा.दिनेश उकिर्डे,प्रा.सी.डी.काटे,आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते
म.गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुजन करण्यात अाले अहिंसात्मक व असहकार आंदेलनाने म.गांधीनी भारताला स्वातंत्र्य मिळवुन दिले रविंद्रनाथ टागोर यांनी म.गांधी यांना प्रथम महात्मा ही पदवी दिली.लोक त्यांना प्रेमाने बापूच म्हणत ते सविनय सत्याग्रहाचे जनक होते त्यांची जयंती जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसादिन म्हणून साजरी केली जाते.अहिंसेच्या तत्वावर त्यांनी पहिला सत्याग्रह दक्षिण आफ्रिकेत केला व त्या नंतर तिला पण मध्ये शेतकऱ्यांना जुलमी कर व जमिनदार यांच्या विरोधात लढण्यासाठी एकत्र केले म.गांधीनी गरिबी निर्मुलन,स्वावलंबन,स्रियांना समान हक्क,सर्वधर्म समभाव,अस्पृश्यता निवारण,स्वराज्य प्राप्ती साठी त्यांचे योगदान महान आहे या बरोबरच भारतीचे माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांचीही जयंतीचे स्मरण करण्यात आले शास्त्री निष्ठा व क्षमता यासाठी जनमानसात लोकप्रिय होते.ते नम्र व आंतरिक शक्तीचे असल्यामुळे ते लोकभावना समजून घेत असत दूरदृष्टी वृत्ती असल्यामुळे त्यांनी देशाला विकासाच्या मार्गावर पोहचविले.त्यांच्यावर म.गांधीच्या विचारांचा पगडा होता.त्यांनी जय जवान,जय किसान ही नारा देशाला दिला हा नारा देशाला प्रेरक ठरला देशाचे सैनिक सक्षम असतिल तर शत्रूंच्या आक्रमणाची भिती नाही व देशाचा शेतकरी राजा सुखी समाधानी,कष्टकरी असेलतर देशाला अन्न धान्यांचा कधिच तुटवडा पडणार नाही अशी लालबहाद्दूर शास्त्री यांची भावना होती इसे प्रतिपादन आपल्या मनोगतातुन प्रा.नारायणे यांनी व्यक्त केले म.गांधी सप्ताहात महाविद्यालयात स्वच्छता मोहीम,म.गांधी रिसर्च फाऊंडेशन जळगाव तर्फे म.गांधींच्या विचारावर आधारित परिक्षेचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे विविध उपक्रम सप्ताहात राबविण्यात येणार असल्याचे प्राचार्य डॉ.एस.आय.पटेल यांनी सांगितले यावेळी प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते .अनिल हातेकर,दिलीप आहिरराव,विलास आहेर,एम.व्ही.दिवटे व स्वयंसेवक
चेतन देशमुख,वैभव घोलप, कृष्णा तिनपाईले,तेजस जाधव,जयेश गरूड,आहेर यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment